मालेगाव पोटनिवडणूक : मतदारांमध्ये निरूत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 02:44 PM2020-01-09T14:44:25+5:302020-01-09T14:47:25+5:30
मालेगाव : महापालिकेच्या प्रभाग क्र. १२ ड च्या रिक्त जागेसाठी सकाळी ७.३० वाजता सुरूवात झाली.
मालेगाव : महापालिकेच्या प्रभाग क्र. १२ ड च्या रिक्त जागेसाठी सकाळी ७.३० वाजता सुरूवात झाली. दुपारी दोन वाजेपर्यंत १७.७४ टक्के मतदान झाले. महापालिकेच्या प्रभाग १२ ड च्या रिक्त जागेसाठी आज मतदान प्रक्रिया घेतली जात आहे. त्यामुळे मतदारांमध्ये निरूत्साह दिसून येत आहे. २४ हजार ५५४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. बुलंद एकबाल यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेच्या पोटनिवडणुकीत पाच उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. जनता दलाचे मुस्तकीम डिग्नीटी तर काँग्रेसचे मोहंमद फारूख कुरैशी यांच्यात सरळ सामना होत आहे. मोहंमद इम्रान शकील अहमद अन्सारी, अब्दुल खालीक गुलाब मोहंमद मोबीन व मोहंमद इस्माईल जुम्मन अन्सारी हे तिघे अपक्ष लढत आहेत.
या प्रभागात १२ हजार १०६ महिला, तर १२ हजार ४०८ पुरुष असे २४ हजार ५१४ मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नितीन कापडणीस कामकाज पाहत आहेत. एटीटी हायस्कूल, शेख अब्दूल वदूद विद्यालय, जे.ए. टी. गर्ल्स हायस्कूल, महापालिका उर्दू शाळा क्र. १, पारसी सोडा वॉटरजवळील शाळा क्र. ३३ मधील मतदान केंद्रांवर मतदान शांततेत सुरू आहे.
अत्यंत प्रतिष्ठेच्या होत असलेल्या प्रभाग क्र. १२ ड च्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सतर्कता बाळगली आहे. परिसरात मतदान प्रक्रिया काळात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून परिस्थितीवर पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, मंगेश चव्हाण लक्ष ठेवून आहेत. मतदान केंद्रांवर मतदारांसाठी सावलीसाठी मंडप, पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यात आले आहे.