मालेगाव न्युज - ५
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:12 AM2021-01-04T04:12:19+5:302021-01-04T04:12:19+5:30
मालेगाव : शहर परिसरात डास-मच्छरांचे प्रमाण वाढले असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरात आधीच कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत ...
मालेगाव : शहर परिसरात डास-मच्छरांचे प्रमाण वाढले असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरात आधीच कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात बदलत्या हवामानामुळे डासांचे साम्राज्य वाढल्याने मनपाने औषध फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.
----
मोकाट जनावरांच्या बंदोबस्ताची मागणी
मालेगाव : शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला असून, महापालिकेने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. शहरात नुकतेच मोसम पूल चौकात सिग्नल बसविण्यात आले. टप्प्याटप्प्याने इतरत्रही सिग्नल बसविले जाणार आहेत. मात्र, मोकाट जनावरांचा वाहनांना अडथळा येत आहे.
-----
थंडी अचानक गायब
मालेगाव : गेल्या काही दिवसांपासून शहर व परिसरात थंडीचा कडाका वाढला होता; परंतु गेल्या दोन दिवसांपासून अचानक थंडी गायब झाली असून, उकाडा वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना थंडीच्या दिवसात रात्री उकाड्यामुळे हैराण व्हावे लागत आहे.
-----
मालेगावात कोरोनाचा चढउतार
मालेगाव : शहरात कोरोना रूग्णांच्या संख्येचा चढउतार सुरू असून, रोज एक-दोन आढळणारे कोरोनाबाधितांची संख्या वाढली असून, आता दररोज १० ते १५ बाधित रुग्ण मिळून येत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात कोरोना नियंत्रणात असताना शहरात मात्र नियंत्रण मिळविण्यात अपयश आले आहे.
----
‘मास्क’ विरोधात कारवाई ‘शून्य’
मालेगाव : शहरात पोलीस आणि महापालिकेतर्फे कोरोनाचा संसर्ग वाढू नये, म्हणून नागरिकांना ‘मास्क’ लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, शहरात कुणीही तोंडावर ‘मास्क’ लावत नसल्याचे दिसून येते. अपवादात्मक स्थितीत नागरिक ‘मास्क’ वापरत असून, मनपा आणि पाेलीस कोणतीही कारवाई करीत नसल्याने नागरिकांत ‘संशय’ व्यक्त होत आहे.