मालेगावी ऑक्सिजन प्रकल्प आठवडाभरात कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:10 AM2021-06-19T04:10:26+5:302021-06-19T04:10:26+5:30
या प्रकल्पामुळे टॅंक रिफील केल्यानंतर १५ दिवस पुरेल एवढा ऑक्सिजन साठा उपलब्ध होणार आहे. कोरोनाच्या प्रारंभी हॉटस्पॉट ठरलेल्या व ...
या प्रकल्पामुळे टॅंक रिफील केल्यानंतर १५ दिवस पुरेल एवढा ऑक्सिजन साठा उपलब्ध होणार आहे. कोरोनाच्या प्रारंभी हॉटस्पॉट ठरलेल्या व दुसऱ्या लाटेत मालेगावी ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली होती. या प्रकाराची कृषिमंत्री दादा भुसे यांनी गंभीर दखल घेत ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यासाठी शासनाकडून २ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता. या प्रकल्पाचे काम ठेकेदाराने पूर्ण केले आहे. सद्यस्थितीत टॅंक उभारण्यात आले आहेत. येत्या आठवडाभरात हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे.
कोट....
ऑक्सिजन प्रकल्पामुळे सामान्य रुग्णालयातील ऑक्सिजनची टंचाई दूर होणार आहे. या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तांत्रिक जोडणीनंतर येत्या आठवडाभरात हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. १५ दिवस पुरेलएवढा ऑक्सिजनसाठा साठविता येणार आहे.
- डॉ. हितेश महाले, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, मालेगाव.
फोटो आहे.....
===Photopath===
180621\18nsk_1_18062021_13.jpg
===Caption===
मालेगावी सामान्य रूग्णालय आवारात उभारण्यात आलेला ऑक्सिजन टॅंक.