मालेगावी वीज कामगारांचा मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 06:32 PM2019-03-31T18:32:40+5:302019-03-31T18:33:53+5:30
मालेगाव येथील मराठा दरबार हॉलमध्ये महाराष्टÑ इलेक्ट्री सिटी वर्कर्स फेडरेशनतर्फे वीज कामगारांचा मेळावा घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्कर्स फेडरेशचे अध्यक्ष मोहन शर्मा होते.
मालेगाव : येथील मराठा दरबार हॉलमध्ये महाराष्टÑ इलेक्ट्री सिटी वर्कर्स फेडरेशनतर्फे वीज कामगारांचा मेळावा घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्कर्स फेडरेशचे अध्यक्ष मोहन शर्मा होते. प्रमुख पाहुणे म्हणून कामगार नेते व्ही. डी धनवटे, ज्योती नटराजन, आयटकचे सचिव राजू देसले, विश्वास पाटील, अरुण म्हस्के, एस. आर. खतीब, चिपळुनचे कार्यकारी अभियंता पी. एस. जमधाडे, एन. के. चौरे, वर्कर्स फेडरेशनचे राज्य संयुक्त सचिव जी. एच. वाघ, राजेंद्र भोसले, पंडित कुमावत, ललीत वाघ, रोहिदास पवार आदि उपस्थित होते.
यावेळी वर्कर्स फेडरेशनचे कार्याध्यक्ष सी. एन. देशमुख यांनी मार्गदर्शन केले. सध्या कंपनीत होत असलेला बदल खाजगीकरण, पगार वाढ व महावितरण कंपनीच्या धोरणाबाबत चर्चा करण्यात आली. ईपीएस पेन्शनबाबत माहिती शर्मा यांनी दिली. सूत्रसंचलन ललीत वाघ यांनी केले. यावेळी सचिन अहिरे, भास्कर आहेर, गणेश सूर्यवंशी, शरद देवरे, संदीप शेवाळे, प्रशांत बच्छाव, सुनिल देवरे, मंकेश चव्हाण, जगन्नाथ अहिरे आदिंसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.