मालेगावचे वीज कर्मचारी मदतीसाठी रायगडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 10:12 PM2020-06-17T22:12:14+5:302020-06-18T00:28:41+5:30

मालेगाव : राज्यात आलेल्या चक्रीवादळाने कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, रायगड जिल्ह्यात विजेचे खांब आणि रोहित्र कोलमडून पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Malegaon power workers rushed to Raigad for help | मालेगावचे वीज कर्मचारी मदतीसाठी रायगडला

मालेगावचे वीज कर्मचारी मदतीसाठी रायगडला

Next

मालेगाव : राज्यात आलेल्या चक्रीवादळाने कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, रायगड जिल्ह्यात विजेचे खांब आणि रोहित्र कोलमडून पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मालेगाव तालुक्यासह जिल्ह्यातील वीज वितरण विभागाचे कर्मचारी रायगड जिल्ह्यात रवाना झाले असून, तेथील वीजपुरवठा सुरळीत करून जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी मदत करीत आहेत. वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी मालेगाव मंडळातील अभियंते व जनमित्र रायगड जिल्ह्याकडे रवाना झाले. नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर
तसेच अधीक्षक अभियंता रमेश सानप यांनी मार्गदर्शन केले. त्यांची भेट घेऊन त्यांना सुरक्षित अंतर, सॅनिटायझर व मास्क वापरायच्या सूचना दिल्या. वीजपुरवठा जलद गतीने पूर्ववत करण्याचे तसेच विद्युत सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आवाहन केले.
विद्युत सुरक्षा साहित्य, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर राखीत सदर तीन खासगी लक्झरी बस रवाना करण्यात आल्या आहेत. यावेळी संघटनेचे प्रतिनिधी प्रवीण वाघ, गुरुदास वाघ, प्रभाकर व्यवहारे, दीपक भामरे, किशोर पवार, राजेंद्र देसले आदी उपस्थित होते.
--------------------
७८ जणांचा समावेश
निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा बसलेल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन उपविभागात कोलमडलेली यंत्रणा व वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी नाशिक परिमंडळच्या मालेगाव मंडळातील ९ अभियंते, ६७ जनमित्र असे एकूण ७८ जण मदतीसाठी सोमवारी रवाना झाले आहेत. पेण मंडळ कार्यालयात सर्व जर्मचारी राहत असून पेण, श्रीवर्धन व रायगड जिल्ह्यात वादळाने पडलेले विजेचे खांब उभे करून वीजपुरवठा सुरळीत करीत आहेत.

Web Title: Malegaon power workers rushed to Raigad for help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक