मालेगावी यंत्रमाग कामगाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 12:36 AM2018-11-14T00:36:58+5:302018-11-14T00:37:20+5:30
मालेगाव शहरातील मदनीनगर विद्युत उपकेंद्रासमोरील यंत्रमाग कारखान्यात कामगाराचा सायंकाळी सहा वाजता गळा कापलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.
आझादनगर : मालेगाव शहरातील मदनीनगर विद्युत उपकेंद्रासमोरील यंत्रमाग कारखान्यात कामगाराचा सायंकाळी सहा वाजता गळा कापलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.
मोहंमद शफी आलम नसरुद्दीन शाह (३०) मूळ रा. खवासपूर जि. सिवान (बिहार) असे मृताचे नाव आहे. तो नेहमी तणावात राहत असल्याचे बोलले जाते. सदर तरुण हा परप्रांतीय आहे. यामुळे सदर तरुणाची हत्या की आत्महत्या असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हबीबउल्ला अन्सारी सगीरउल्ला यांच्या यंत्रमाग कारखान्यात मोहंमद शफी आलम हा चार महिन्यांपासून यंत्रमाग कामगार म्हणून काम करीत होता. परप्रांतीय असल्यामुळे कारखान्यामध्येच त्याचे वास्तव्य होते. कारखान्यातील तरासनवर काम करणाऱ्या कामगाराच्या प्रकार निदर्शनास आला. त्याने यंत्रमाग मालक हबीबउल्ला अन्सारी यांना घटनेची माहिती दिली. सरदार चौक भागात सुट्ट्या पैशांच्या वादातून झालेल्या हाणामारीनंतर सईद अहमद यांचा मृत्यू झाला होता.
त्यामुळे शहरात हत्यांची मालिका सुरू झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.