कोरोना रोखण्यासाठी मालेगावी जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 09:58 PM2020-06-10T21:58:54+5:302020-06-11T00:57:30+5:30
मालेगाव : शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रशासनाने मंगळवारी (दि.९) स्वातंत्र्य सैनिक नगर येथे कॅम्प भागातील नागरिकांची बैठक घेतली. यावेळी विशेष समन्वय अधिकारी तथा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, आपत्ती व्यवस्थापन घटना प्रमुख अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, वैद्यकीय अधीक्षक डॉ. हितेश महाले, पोलीस निरीक्षक निकम आदी उपस्थित होते.

कोरोना नियंत्रणाबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली. नागरिकांनी कोरोनाला घाबरून न जाता वैद्यकीय उपचार घेतले पाहिजे, नागरिकांनी शासनाने दिलेल्या विविध मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, सामाजिक अंतर पाळावे असे आवाहन विशेष समन्वय अधिकारी कडासने यांनी केले.
डॉ. हितेश महाले यांनी कोरोना रोखण्यासाठी काय काळजी घ्यावी, कोरोना रुग्णांवर कशा प्रकारे उपचार केले जातात तसेच मालेगावातील वैद्यकीय सुविधांची माहिती देत मास्क कसे व का वापरावे, हात कसे धुवावेत, कोरोना आजाराची विविध लक्षणे याबाबत माहिती दिली.
यावेळी किशोर बच्छाव, निखिल पवार, विवेक वारुळे, जगदीश गोºहे, भारत म्हसदे, संजय जोशी, रमेश उचित, उन्मेष महेश्वरी, जयेश शेलार, रमेश निकम, संजय फतनानी, सुशांत कुलकर्णी, रघुनंदन सावकार, अॅड. कालिदास तिसगे, मनीष सारंगे,
प्रकाश पाटील, कैलास देवरे,
दिलीप वाणी, सचिन पठाडे, चेतन अहिरे, महेश वा राजेश जाधव, रुपेश वाघ, सचिन सोनवणे, हेमंत बागडे, गणेश कोल्हे, राकेश शेवाळे आदी उपस्थित होते.
----------------------
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत माहिती असलेले पत्रक यावेळी वाटप करण्यात आले. माहितीपत्रक शहरातील किराणा दुकानात व मेडिकल स्टोअर्समध्ये वाटप करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत असून, त्या माध्यमातून थेट घराघरात माहिती पोहचण्याचा प्रयत्न केला जात आहे.