मालेगाव प्रजासत्ताक दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:48 AM2021-02-05T05:48:49+5:302021-02-05T05:48:49+5:30
मालेगाव: येथील भारत विद्यालयात कार्यक्रमाच्या अध्यक्षा व मुख्याध्यापिका कल्पना अहिरे होत्या. त्यांनी ध्वजारोहण केले. वेदांत सोनवणे व ...
मालेगाव: येथील भारत विद्यालयात कार्यक्रमाच्या अध्यक्षा व मुख्याध्यापिका कल्पना अहिरे होत्या. त्यांनी ध्वजारोहण केले. वेदांत सोनवणे व आर्यन शेवाळे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. ऑनलाईन चित्रकला स्पर्धा तसेच वत्कृत्व स्पर्धा घेण्यात आली होती. त्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले,. अमृता हिरे यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार निवृत्ती बिडगर यांनी मानले.
-----------
आर.बी .एच. कन्या विद्यालय
मालेगाव: येथील आर.बी.एच कन्या विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये प्राचार्या अलका जोंधळे अध्यक्षस्थानी होत्या. त्यांनी ध्वजारोहण केले. ध्वजगीत झाले. गाईड व आर. एस. पी च्या विद्यार्थिनींनी क्रीडा शिक्षक एस बी, शेलार, नितीन गायकवाड व विलास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संचलन केले. विद्यालयामार्फत ऑनलाईन घेण्यात आलेल्या मतदान आणि बालिका दिवस यानिमित्ताने स्पर्धा घेण्यात येऊन विजेत्यांना प्रमाणपत्र व बक्षीस वाटप करण्यात आले. जान्हवी सूर्यवंशी हिला आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार देण्यात आला. सूत्रसंचालन माधवी नेरकर यांनी केले.