मालेगावी प्रजासत्ताक दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:48 AM2021-02-05T05:48:51+5:302021-02-05T05:48:51+5:30

जळगाव निंबायती : येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गोविंदराव यशवंतराव पाटील विद्यालयात प्राचार्य जी. एस. फसाले यांच्या हस्ते ध्वजारोहण ...

Malegaon Republic Day | मालेगावी प्रजासत्ताक दिन

मालेगावी प्रजासत्ताक दिन

Next

जळगाव निंबायती : येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गोविंदराव यशवंतराव पाटील विद्यालयात प्राचार्य जी. एस. फसाले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्काऊट गाईडचे ध्वजारोहण ज्येष्ठ शिक्षिका के. एन. देसाई यांनी केले. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्षा कासूताई पाटील होत्या. समवेत संस्थेचे सचिव महेंद्र पाटील, समन्वयक निंबाजी शिंदे उपस्थित होते. यावेळी कोरोना संकट काळात कर्तव्य बजावणाऱ्या आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, पोलीस कर्मचारी आदी कोरोना योद्ध्यांना सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक प्रा. पी. यु. शिंदे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. अमोल अहिरे यांनी केले. _____

---आपुलकी संस्था

मालेगाव: कलेक्टर पट्टा भारत माता उद्यान येथे आपुलकी संस्थेच्या वतीने भारत मातेचे पूजन भाजप जिल्हा अध्यक्ष सुरेश निकम व भारत स्वच्छता अभियानाचे महाराष्ट्र संयोजक दादास जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास देवा पाटील, सुरेश गायकवाड. प्रकाश मुळे, रवी सूर्यवंशी, राहुल आघारकर सुधीर जाधव उपस्थित होते.

-------------चिंचावडला ध्वजारोहण

चिंचावड : येथील ग्रामपंचायतींचे ध्वजारोहण प्रशासक ग्रामपंचायत विस्तार अधिकारी थोरात, सोसायटी ध्वजारोहण सभापती साहेबराव देवरे यांनी, जनता विद्यालयात शंकर भामरे यांनी, मराठी शाळेत जिभाऊ अहिरे यांनी ध्वजारोहण केले. गुंजाळवाडीत ध्वजारोहण नाना देवरे यांनी, काकळीज नगर येथे माधव काकळीज यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

-------

महिला महाविद्यालय

मालेगाव : येथील श्रीमती पुष्पाताई हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालयात प्राचार्य डॉ. उज्ज्वला देवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आकाशात फुगे सोडून आरोग्य पर्यावरण आणि शांततेचा संदेश यामार्फत देण्यात आला. नियोजन महाविद्यालयाच्या क्रीडा संचालिका डॉ. लहानु जाधव यांनी केले.

-----–-----जामेअतुल हुदा हायस्कूल

मालेगाव : येथील अलहुदा सोशल वेल्फेअर सोसायटी संचलित जामेअतुल हुदा हायस्कूल येथे संस्थेचे सचिव शाहीद इक्बाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे जमील मसीहउल्लाह, रईस सितारा शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

---------.-------––------------

नेहरू विद्यालय, पाटणे

पाटणे : येथील पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्राचार्य आर. एस. अहिरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रास्ताविक के. बी. धनेश्वर यांनी केले. संचालन के. पी. अहिरे यांनी केले. स्काऊट गाईड ध्वजाचे संचलन एस. एस. कुंवर यांनी केले. स्काऊट गाईड ध्वजारोहण एस. टी. महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन आर. एस. पटाईत आणि बी. एस. महाजन यांनी केले. ए .व्ही. सरक यांनी आभार मानले.

-------

न्यू इंग्लिश स्कूल, पाडळदे

मालेगाव शिवरोड : तालुक्यातील पाडळदे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक युवराज पगार होते. ध्वजारोहण संस्थेचे संचालक, ज्येष्ठ शिक्षक संजय तरवटे यांच्याहस्ते झाले. सूत्रसंचालन किरण पगार यांनी केले. कार्यक्रमाला भारती सोनवणे, किरण पगार, माधव ठोके, अभय देशमुख, राजू आहिरे, योगेश पवार, गोपाल पवार, ज्ञानेश्वर सोनवणे, दादा मोरे, किरण झिंजर, सुरेश मंडळ आदी उपस्थित होते. माधव ठोके यांनी आभार मानले.

-------------

काबरा विद्यालय

मालेगाव: येथील राजस्थान शिक्षण प्रसारक मंडळ संचालित कै. ल. रा. काबरा प्राथमिक, माध्यमिक विद्यालय तसेच कै. बी. जी. काबरा कनिष्ठ महाविद्यालय व कै. पु. श्या. लाखोटिया बालमंदिर यात अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन नटवरलाल काबरा होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी स्काऊट गाईड संचलन तसेच लेझिम पथकाच्या माध्यमातून नृत्य सादर केले. आस्था काबरा, ज्योत्सना चव्हाण या विद्यार्थिनीने संस्कृत भाषेतून, तर विधी जाजू हिने इंग्रजी भाषेतून मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमप्रसंगी अध्यक्ष नटवरलाल काबरा यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष रघुवीरा पाटोदिया, उपाध्यक्ष ओमप्रकाश सारडा, कार्यवाहक गोविंद नारायण तोतला, कोषाध्यक्ष अशोक राणासारिया उपस्थित होते. सूत्रसंचालन निनाद म्हसदे यांनी केले. कार्यक्रमाचे योगिता आहेर यांनी आभार मानले.

---------- रावळगाव महाविद्यालय

कुकाणे : श्री स्वामी समर्थ विद्या प्रसारक मंडळ, डांगसौंदाणे, ता. बागलाण, जि. नाशिक संचलित रावळगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉ. अरुण येवले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष सुरेश वाघ, उपप्राचार्य प्रा. गौतम निकम व परीक्षा विभागाचे प्रमुख प्रा. जे. व्ही. मिसर उपस्थित होते.

Web Title: Malegaon Republic Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.