मालेगावी रस्ता सुरक्षा अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:48 AM2021-02-05T05:48:24+5:302021-02-05T05:48:24+5:30
मालेगाव कॅम्प : येथील मोसम पूल महात्मा गांधी पुतळा परिसरात परिवहन कार्यालयातर्फे परिवहन अधिकारी किरण बिडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ...
मालेगाव कॅम्प : येथील मोसम पूल महात्मा गांधी पुतळा परिसरात परिवहन कार्यालयातर्फे परिवहन अधिकारी किरण बिडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक सुरक्षा सप्ताह मोहिमेंतर्गत रिक्षाचालक व अन्य वाहन चालकांना वाहतुकीबाबत पत्रके वाटण्यात आली. मोसम पूल परिसरात रिक्षाचालक, दुचाकीस्वार व अन्य लहान-मोठ्या वाहनचालकांना कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी वाहतुकीच्या नियमांविषयीची पत्रके वाटली. या पत्रकातून वाहन चालविण्यासाठीच्या नियमावलीबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. यात वाहनाची वेगमर्यादा पाळणे, क्षमतेपेक्षा अधिक जादा माल वाहतूक न करणे, वाहतूक चिन्हांचे पालन करणे, रस्त्यावर बेकायदेशीर व बेशिस्त वाहन चालवणे, दुचाकीवर दोनपेक्षा अधिक व्यक्तिंनी जाऊ नये, हेल्मेट सक्ती, रस्ता अपघात झाला तर मदत करणे, शासकीय नियम पाळणे, परवानाधारकांनीच वाहन चालवणे, आदी नियमावलीची माहिती पत्रकातून देण्यात आली आहे. या पत्रक वाटप मोहिमेत कार्यालयातील वरिष्ठ लिपिक महेंद्र पवार, दर्शन सोनवणे, किरण जाधव, प्रसाद बारगळ, वाय. के. जाधव, पुनीत जाधव, जितेंद्र देसाई, आदी सहभागी झाले होते.