मालेगाव : मदनीनगर उपकेंद्रातील घटना वीज उपकेंद्रात शॉर्टसर्किटने आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 11:58 PM2017-12-29T23:58:20+5:302017-12-30T00:18:06+5:30

Malegaon: Shotcricket fire in subdivision of electricity at Madinnagar sub-center | मालेगाव : मदनीनगर उपकेंद्रातील घटना वीज उपकेंद्रात शॉर्टसर्किटने आग

मालेगाव : मदनीनगर उपकेंद्रातील घटना वीज उपकेंद्रात शॉर्टसर्किटने आग

googlenewsNext
ठळक मुद्देबिघाड कुठे व कशामुळे झाला याबाबत शोधकार्य घटनास्थळाची पाहणी

आझादनगर : मालेगावच्या मदनीनगर विद्युत उपकेंद्रात सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास मुख्य विद्युतवाहिनीत बिघाड होऊन शॉर्टसर्किट झाल्यान आग लागली. दाभाडी उपकेंद्रातून मदनीनगरच्या केंद्राला विद्युतपुरवठा करण्यात येतो. या मुख्य उच्चदाब विद्युतवाहिनीत बिघाड झाल्याने शॉर्टसर्किट होऊन सिलिंडर-फटाक्यासारखा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.
शॉर्टसर्किटमुळे झालेल्या प्रकाशामुळे किमान तीन किलोमीटर अंतरावरील नागरिकांना काय झाले ते समजेनासे झाले होते. नागरिकांत एकच घबराट पसरल्याने लोक जीव वाचविण्यासाठी सैराभैरा पळत सुटले. अशा परिस्थितीत सेवा बजावणाºया जगताप नामक कर्मचाºयाने जिवाची पर्वा न करता विद्युतपुरवठा खंडित केला. शॉर्टसर्किट कशामुळे झाले याचे कारण अद्याप कळू शकले नाही. यामुळे किती नुकसान झाले याचा अंदाज समोर आले नाही. रात्री उशिरापर्यंत बिघाड कुठे व कशामुळे झाला याबाबत शोधकार्य सुरू होते. दरम्यान आमदार आसीफ शेख यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
आमदारांकडून घटनेची पाहणी
मालेगाव मध्यचे आमदार आसीफ शेख यांनी शहरातील मदनीनगर भागातील शॉर्टसर्किटने विद्युत उपकेंद्रात लागलेल्या आगीची पाहणी केली. परिसरात वीजपुरवठा खंडित झाल्याने अंधाराचे साम्राज्य होते. आमदार शेख यांनी वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता आडे व उपविभागीय अधिकारी राठोड यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून झालेल्या घटनेची माहिती देऊन संबंधित अधिकाºयांना उपाययोजना करण्याचे आदेश दिले. संबंधित अधिकाºयांनी घटनास्थळी भेट देऊन शब्बीरनगर व रौनकाबाद फिडरवर दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.

Web Title: Malegaon: Shotcricket fire in subdivision of electricity at Madinnagar sub-center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग