मालेगावी तस्करीचे मांडूळ जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 01:44 AM2021-04-05T01:44:14+5:302021-04-05T01:45:10+5:30
मालेगाव तालुक्यातील करंजगव्हान - टिंगरी रस्त्यावर मोरझरी परिसरात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी छापा टाकून तस्करीसाठी आणलेले दुर्मिळ गांडूळ जप्त केले असून तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. चार जण पळून जाण्यात यशस्वी झाले.
मालेगाव : तालुक्यातील करंजगव्हान - टिंगरी रस्त्यावर मोरझरी परिसरात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी छापा टाकून तस्करीसाठी आणलेले दुर्मिळ गांडूळ जप्त केले असून तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. चार जण पळून जाण्यात यशस्वी झाले.
मालेगावी महामार्गावरील हॉटेलमध्ये काही इसम दुर्मिळ मांडूळ जातीचे साप विक्रीसाठी घेऊन येणार असल्याच्या माहितीनुसार मालेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी विलास कांबळे व त्यांच्या पथकाने हॉटेल स्टार येथे सापळा रचला. परंतु, विक्रीसाठी आलेल्या संबंधित इसमाना संशय आल्याने व्यवहार होऊ शकला नाही. कांबळे यांनी या व्यवहारात मध्यस्थ असलेल्या व्यक्तीशी पुन्हा संपर्क साधून बोलणी केली. म्हसोबा मंदिराजवळ व्यवहारासाठी बोलविले. त्याठिकाणी कांबळे व त्यांच्या पथकाने छापा टाकला. गर्दीचा फायदा घेऊन मुख्य चार आरोपी मांडूळ असलेली बॅग टाकून पसार झाले.