मालेगावी तस्करीचे मांडूळ जप्त तिघे संशयित ताब्यात,चार फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:14 AM2021-04-05T04:14:07+5:302021-04-05T04:14:07+5:30
येथील उपविभागीय वनाधिकारी जगदीश येडलावार यांना सोलापूरचे मानद वन्यजीव रक्षक तथा वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरोचे सदस्य रोहन भाटे यांनी ...
येथील उपविभागीय वनाधिकारी जगदीश येडलावार यांना सोलापूरचे मानद वन्यजीव रक्षक तथा वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरोचे सदस्य रोहन भाटे यांनी दिलेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. मालेगावी महामार्गावरील हॉटेलमध्ये काही इसम सर्प वर्गातील दुर्मिळ असलेल्या मांडूळ जातीचे साप विक्रीसाठी घेऊन येणार असल्याच्या माहितीनुसार मालेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी विलास कांबळे व त्यांच्या पथकाने हॉटेल स्टार येथे सापळा रचला. बनावट खरेदीदार पाठवून मिळालेल्या माहितीची खातरजमा केली. परंतु, विक्रीसाठी आलेल्या संबंधित इसमाना संशय आल्याने त्याठिकाणी व्यवहार होऊ शकला नाही व संशयित तेथून फरार झाले.
कांबळे यांनी या व्यवहारात मध्यस्थ असलेल्या व्यक्तीशी पुन्हा संपर्क साधून व्यवहाराबाबत बोलणी केली. त्यामुळे मांडूळ विक्रेत्यांनी मालेगाव तालुक्यातील करांजगव्हान-टिंगरी रस्त्यावरील मोरझरी परिसरातील म्हसोबा मंदिराजवळ व्यवहारासाठी बोलविले. त्याठिकाणी वनपरिक्षेत्र अधिकारी कांबळे व त्यांच्या पथकाने छापा टाकला. गर्दीचा फायदा घेऊन मुख्य चार आरोपी मांडूळ असलेली बॅग टाकून पसार झाले.
वनपथकाने तीन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. अधिक तपास उपविभागीय वनाधिकारी जगदीश येडलावार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अतुल देवरे, बी एस सुर्यवंशी, सागर पाटील वनरक्षक बागुल, रफिक पठाण, तुषार देसाई, अनिल ठाकरे आदी करीत आहेत.
फोटो आहे