मालेगाव तालुक्यात दोन बिबटे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 01:12 PM2019-01-16T13:12:58+5:302019-01-16T13:13:09+5:30
मालेगाव : तालुक्यातील टिपे- वडेल शिवारात धुमाकुळ घालणारे एक मादी बिबट्या व दोन वर्षाचे बिबट्याचे पिल्लु वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकले आहेत.
मालेगाव : तालुक्यातील टिपे- वडेल शिवारात धुमाकुळ घालणारे एक मादी बिबट्या व दोन वर्षाचे बिबट्याचे पिल्लु वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकले आहेत. वन विभागाचा पुढील आदेश होई पर्यंत पशुवैद्यकीय अधिकाºयांच्या देखरेखीखाली लुल्ले रोपवाटिकेत दोघा बिबट्यांना ठेवण्यात येणार आहे. टिपे व वडेल शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत होते. यामुळे शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. गेल्या १० जानेवारी रोजी टिपे शिवारातील वन विभागाच्या मालकी क्षेत्रातील लिंबाच्या झाडावर सकाळी सात ते रात्री उशीरापर्यंत बिबट्याने मुक्काम ठोकला होता. याची माहिती शेतकºयांनी वन विभागाला दिली होती. ११ जानेवारी रोजी या भागात वन विभागाने पिंजरा लावला होता. बुधवारी पहाटे सहा ते सात वय वर्ष असलेली मादी व दोन वर्षाचे पिल्लु पिंजºयात अडकले. त्यांची रवानगी लुल्ले येथील वन विभागाच्या रोपवाटीकेत करण्यात आली आहे. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांच्या आदेशानंतरच त्यांना अधिवास क्षेत्रात सोडण्यात येणार आहे. पशु वैद्यकीय अधिकारी जावेद खाटीक यांनी बिबट्यांची तपासणी केली आहे. वनपाल विलास शिंदे, भानुदास सूर्यवंशी, वनरक्षक तुषार देसाई, दीपक हिरे आदिंनी पिंजरा रोपवाटीकेत ठेवला आहे.