मालेगाव तालुक्यात तीन ग्रामपंचायतींसाठी ८४.४६ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 10:44 PM2019-12-08T22:44:11+5:302019-12-08T22:44:46+5:30
मालेगाव : तालुक्यातील नीळगव्हाण, काष्टी व नगाव दिगर या तीन ग्रामपंचायतीची निवडणूक होत असून तिन्ही ग्रामपंचायतीसाठी एकूण ८४.४६ टक्के मतदान झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : तालुक्यातील नीळगव्हाण, काष्टी व नगाव दिगर या तीन ग्रामपंचायतीची निवडणूक होत असून तिन्ही ग्रामपंचायतीसाठी एकूण ८४.४६ टक्के मतदान झाले. काष्टी येथे ७६८ महिलांनी तर ६७५ पुरुष असे एकूण १४२५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
नीळगव्हाण येथे ४४४ महिला, ५१२ पुरुष अशा एकूण ९५६ मतदारांनी मतदान केले. निमगाव येथे १ हजार १ महिला, ११८१ पुरुष अशा २ हजार १८२ मतदारांनी मतदान केले. नगाव दिगर ग्रामपंचायतीसाठी ६१७ महिला, ६४४ पुरुष अशा एकूण १ हजार २६१ मतदारांनी मतदान केले. नगाव दिगरला ९३.९६ टक्के मतदान झाले. नीळगव्हाण ग्रा.पं.साठी ८६.८३ टक्के तर काष्टी ग्रामपंचायतीसाठी ७६.२४ टक्के मतदान झाले. निमगाव व कळवाडी ग्रा.पं. पोटनिवडणूक घेण्यात आली. दोन्ही ग्रामपंचायतीत ६४.२२ टक्के मतदान झाले. निमगावला ६१.६९, कळवाडीला ७४.०१ टक्के मतदान झाले. सोमवारी (दि.९) मतमोजणी होईल.