मालेगावी तहसीलचा लिपिक तीन वर्षांपासून गैरहजर
By admin | Published: June 17, 2015 11:20 PM2015-06-17T23:20:55+5:302015-06-17T23:21:22+5:30
मालेगावी तहसीलचा लिपिक तीन वर्षांपासून गैरहजर
मालेगाव : येथील तहसील कार्यालयात नेमणुकीस असलेला एक कर्मचारी सुमारे तीन वर्षांपासून कामावर गैरहजर आहे.
येथील तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांमध्ये लिपिकाचे १७ पदे मंजूर असून, यातील एकही पद रिक्त नाही. यामुळे शंभर टक्के कर्मचारी असलेले जिल्ह्यातील एकमेव तहसील असण्याची शक्यता आहे. असे असले तरी या लिपिकापैकी एक कर्मचारी सुमारे साडेतीन वर्षांपासून कामावर गैरहजर असल्याची माहिती मिळाली आहे. हा कर्मचारी रजेवर गेला होता. त्याला तीन वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे. या लिपिकाविषयी कोणालाही काही माहिती नसल्याचे म्हणणे आहे. हा कर्मचारी कामावर नसल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून त्याचे वेतन काढण्यात आलेले नाह. सध्या तहसील कार्यालयात तहसीलदारांसह पाच ते सहा नायब तहसीलदार, लिपिक, शिपाई आदि प्रकारचे कर्मचारी नियुक्त आहे.