मालेगाव लसीकरणाचा टप्पा पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:16 AM2021-08-23T04:16:43+5:302021-08-23T04:16:43+5:30
लसीकरण केंद्रासह गर्दीच्या ठिकाणी सॅनिटायझर, मास्क, सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीची काळजी घेण्यासंदर्भात जनजागृती करण्यात येते. आजमितीस कोरोना प्रभाव शून्यावर ...
लसीकरण केंद्रासह गर्दीच्या ठिकाणी सॅनिटायझर, मास्क, सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीची काळजी घेण्यासंदर्भात जनजागृती करण्यात येते. आजमितीस कोरोना प्रभाव शून्यावर आणण्यात यश आले आहे. कोरोना लसीकरणासंदर्भात सर्वच घटकांनी जनजागृती केल्यामुळे मालेगाव ग्रामीणने लसीकरणात लाखाचा टप्पा पार केला आहे.
- डॉ. शैलेशकुमार निकम, तालुका आरोग्य अधिकारी
इन्फो...
आजपर्यंत झालेले लसीकरण
आरोग्य अधिकारी व कर्मचारी पहिला डोस- ९१२, दुसरा डोस- ९१०
पोलीस व शासकीय कर्मचारी पहिला डोस - चार हजार १०, दुसरा डोस - तीन हजार ३२०
१८ ते ४४ वर्षांवरील पहिला डोस - २२ हजार ७५९, दुसरा डोस - २१६
४५ वर्षांवरील पहिला डोस- २५ हजार ३२५, दुसरा डोस- १२ हजार २४
६० वर्षांवरील पहिला डोस - २० हजार ९१८, दुसरा डोस - १० हजार ३३६
एकूण लसीकरण पहिला डोस - ७३ हजार ९२४, दुसरा डोस - २६ हजार ८०६
एकूण - एक लाख ७३०