नदीकाठावरील झोपड्यांसाठी मालेगावी दक्षता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:11 AM2021-06-28T04:11:02+5:302021-06-28T04:11:02+5:30

यावर्षी महापालिकेतर्फे शहरातील १९ ठिकाणांवर पूरस्थितीत काळजी घेण्यासाठी उपाययोजना आखण्यात आली आहे. शहरातील गवळीवाडा, शीतलामातानगर, पंचशीलनगर, मकाजी पेढा, श्रीरामनगर, ...

Malegaon vigilance for riverside huts | नदीकाठावरील झोपड्यांसाठी मालेगावी दक्षता

नदीकाठावरील झोपड्यांसाठी मालेगावी दक्षता

Next

यावर्षी महापालिकेतर्फे शहरातील १९ ठिकाणांवर पूरस्थितीत काळजी घेण्यासाठी उपाययोजना आखण्यात आली आहे. शहरातील गवळीवाडा, शीतलामातानगर, पंचशीलनगर, मकाजी पेढा, श्रीरामनगर, खलीलशेठ चाळ जवळचा भाग, ढोरवस्ती, सांडवा पूल, चावचावनगर, बजरंगवाडी, अमरधाम, स्मशानभूमी, आदिवासीनगर, भिकनशाह दरगाह जवळील भाग, बाहरा बाग, सिद्धार्धनगर, सर्व्हे नं. ५५ नदीकिनारचा भाग, किल्ला झोपडपट्टी, ईदगाह झोपडपट्टी, भायगाव, माणिकनगर, पवारवाडी हा भाग नद्यांना पूर आल्यानंतर पूरस्थितीत वेढला जातो. त्यामुळे नागरिकांच्या घरांमध्ये पूरपाणी गेल्याने नागरिकांचे संसार उघड्यावर पडतात. महापालिकेतर्फे आपत्ती व्यवस्थापन कक्ष अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागाची नुकतीच बैठक मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यात सुकाणू समिती व विविध विभागप्रमुख उपस्थित होते. पावसाळ्यात नदीकाठावरील झोपडपट्टी भागात उपाययोजना करण्यात येत आहेत.

शहरातील सर्व खड्डे बुजविण्यात येत आहेत. शहरातील सर्व बांधकाम साहित्य पावसाळ्यापूर्वी उचलून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बंधारा किंवा नाला अथवा नाल्यावरील पूल फुटल्यास वाहतूक पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्याचे ठरविण्यात आले. धरणे व पाटबंधारे विभागाशी संपर्क व समन्वय ठेवून वेळोवेळी धरणातून साेडण्यात येणाऱ्या पाण्याच्या पातळीबाबत माहिती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. पाण्याच्या टाक्यांवरील वीजरोधक यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. शहरात पुरवठा करण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याची तपासणी करण्यात येणार असून दूषित पाणीपुरवठा होणार नाही आणि नागरिकांच्या आरोग्यास बाधा पोहोचणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. सर्व ड्रेनेजचे चोकअप काढण्यात येत आहे. भूमिगत गटारी पावसाळ्यात तुंबणार नाहीत, याची खबरदारी मनपाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून घेण्यात येत आहे.

नदीकाठच्या लोकांना पुराच्या धोक्याची सूचना देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात राेगराई पसरू नये म्हणून औषधफवारणी करण्यात येत आहे. नदीनाल्यांमधील गाळ काढून नद्यांना प्रवाही करण्यात येत आहे. शहरात पावसाळ्यात वीजपुरवठा अखंडित राहावा, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. रस्त्यावर पडलेले पोल विद्युत विभागातर्फे काढून घेण्याची कार्यवाही सुरू आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांचे पथक सुसज्ज करण्यात आले आहे. धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. झोपड्यांना पुराचा धोका संभवत असेल. तर त्या झोपड्या काढून टाकण्याची व्यवस्था महानगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे.

धाेकादायक आणि गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात येणार आहे. पूरपरिस्थितीत स्थलांतरित करण्यात येणाऱ्या नागरिकांच्या तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित भागातील शाळा, समाजमंदिरे, मंगल कार्यालये, कॉलेजेस आणि खाजगी शाळा ताब्यात घेण्यात येणार आहेत. पूरपरिस्थितीची एखादी आपत्ती उद्भवल्यास जखमी नागरिकांना रुग्णालयांमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे. पूरपरिस्थितीत जीवरक्षक आणि पोहणारे कर्मचारी यांच्याकरिता लाइफ रिंग, लाइफ जॅकेट व इतर साधनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

नगररचना आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांच्या वतीने नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात येत आहे. त्यांच्या राहण्याची, भोजनाची आणि पिण्याच्या पाण्याचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे. १ जूनपासून कर्मचारी तीन पाळ्यांमध्ये काम करीत आहेत. नियंत्रण कक्षाचा क्रमांक ०२५५४ २३१९५० असा आहे. अग्निशमन विभागाचे प्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्मचारी काम करीत आहेत. पूरस्थिती हाताळताना नागरिकांचा बचाव करण्यासाठी ट्रॅक्टर, जेसीबी, टीपर, डंपर, वाॅटर टँकर, लाइफगार्ड टँकर, दोर, आदी साहित्य आहे. धोकादायक २१० घरांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. आयेशानगरातील स्वीपर कॉलनी स्थलांतरित करण्यात आली आहे.

Web Title: Malegaon vigilance for riverside huts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.