मालेगाव : क्रीडाभारती, योग विद्याधाम, विवेकानंद केंद्राचा संयुक्त उपक्रम रथसप्तमीनिमित्त हजारो विद्यार्थ्यांचे सामूहिक सूर्यनमस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 12:05 AM2018-01-26T00:05:10+5:302018-01-26T00:22:15+5:30

मालेगाव : रथसप्तमी व जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त क्रीडा संकुलात एकाचवेळी सुमारे हजारो विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्कार घालून सांघिकतेचे दर्शन घडविले.

Malegaon: Yog Vidyadham, Vivekananda Center jointly organized a mass solarium for thousands of students on the occasion of Rathasaptami | मालेगाव : क्रीडाभारती, योग विद्याधाम, विवेकानंद केंद्राचा संयुक्त उपक्रम रथसप्तमीनिमित्त हजारो विद्यार्थ्यांचे सामूहिक सूर्यनमस्कार

मालेगाव : क्रीडाभारती, योग विद्याधाम, विवेकानंद केंद्राचा संयुक्त उपक्रम रथसप्तमीनिमित्त हजारो विद्यार्थ्यांचे सामूहिक सूर्यनमस्कार

Next
ठळक मुद्देसूर्यनमस्काराचा प्रसार व्हावा आदर्श सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक

मालेगाव : रथसप्तमी व जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलात एकाचवेळी सुमारे हजारो विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्कार घालून सांघिकतेचे दर्शन घडविले. येथील क्रीडाभारती, योग विद्याधाम, विवेकानंद केंद्राच्या संयुक्त विद्यमाने तरुणांमध्ये सूर्यनमस्काराची आवड निर्माण व्हावी तसेच पारंपरिक शास्त्रोक्त व्यायामप्रकार सूर्यनमस्काराचा प्रसार व्हावा यासाठी दरवर्षी येथे सामूहिक सूर्यनमस्कार प्रात्यक्षिकांचे आयोजन केले जाते. मनपा आयुक्त संगीता धायगुडे, तहसीलदार ज्योती देवरे, उपविभागीय वनअधिकारी जगदीश एडलावार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. येथील साठफुटी रस्त्यांवरील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलात शहरातील सुमारे पंधरा शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. प्रारंभी योगशिक्षक स्वाती मराठे व महेश अग्रवाल यांनी शास्त्रोक्त आदर्श सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक दाखविले. क्रीडा भारतीचे जिल्हा कार्यवाह तुकाराम मांडवडे त्यांनी खेल खिलाडी खेल हे क्रीडा गीताचे गायन केले. जागतिक स्तरावर सूर्यनमस्काराला आदर्शवत मानले जाते याची सुरुवात भारतीय संस्कृतीत आहे याचे जतन करण्यासाठी सर्वांनी रोज सूर्यनमस्कार घातले पाहिजेत, असे आवाहन तहसीलदार ज्योती देवरे यांनी केले. आयुक्त धायगुडे यांनी स्वच्छतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. क्रीडा भारतीचे भानु कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. सर्व व्यायाम प्रकार असून, नियमितपणे असा सूर्यनमस्कार घालणारी व्यक्तीच निरोगी राहू शकते असेही त्यांनी सांगितले. प्रकल्प प्रमुख भाग्येश कासार यांनी सूत्रसंचालन केले. सर्व शाळातील सहभागी संघांना सहभागाबद्दल सन्मानचिन्ह प्रमुख अतिथींच्या हस्ते देण्यात आले. क्रीडा भारतीचे प्रांतिक उपाध्यक्ष व मालेगाव एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन नितीन पोफळे, योग विद्याधामचे अध्यक्ष दिनेशकुमार लोढा, विवेकानंद केंद्राचे डॉ. सुरेश शास्त्री, महात्मा फुले शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनील वडगे, राजस्थान शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन रविश मारू, मुख्याध्यापक संजय बेलन, सौ. एस. पी. मोरे, तुकाराम मांडवडे, कमलाकर चौधरी, विजय भावसार व्यासपीठावर उपस्थित होते. क्रीडाशिक्षक सुनील चव्हाण व रत्नप्रभा देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. रु. झुं. काकाणी कन्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक मनोरे व योगाडान्स यावेळी सादर केला. यावेळी डॉ. रागिणी भेलसेकर, नम्रता पोफळे, डी. टी. परचुरे आदी नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा भारतीचे अध्यक्ष दादा बहिरम, दीपक पाटील, प्रवीण चौधरी, निखिल पवार, रविराज सोनार, यशवंत खैरनार, निखिल पोफळे, गणेश जंगम, देवेंद्र अलई, संजय हिरे, संजय ठाकूर, भगवान गायकवाड उपस्थित होते.

Web Title: Malegaon: Yog Vidyadham, Vivekananda Center jointly organized a mass solarium for thousands of students on the occasion of Rathasaptami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा