मालेगावकरांचे आरोग्य धोक्यात

By admin | Published: December 3, 2015 10:05 PM2015-12-03T22:05:00+5:302015-12-03T22:07:52+5:30

मालेगावकरांचे आरोग्य धोक्यात

Malegaonkar's health hazard | मालेगावकरांचे आरोग्य धोक्यात

मालेगावकरांचे आरोग्य धोक्यात

Next

मालेगाव : शहरातील डास मच्छरांचे साम्राज्य वाढले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे नागरिकात संताप व्यक्त होत असून महापालिकेला पैसे उपलब्ध करून देण्यासाठी भाजपातर्फे भीक मांगो आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन पोफळे यांनी पत्रकान्वये दिली.
पत्रकात म्हटले आहे की, शहरात कचऱ्याचे साम्राज्य वाढले असून गटारींमध्ये प्लॅस्टिक जमा होऊन गटारी तुंबल्या आहेत. काही ठिकाणी सांडपाणी मोठ्या प्रमाणात जमा झाले असल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. मोसम नदीच्या वाढत्या अस्वच्छतेमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात विविध साथींनी थैमान घातले असून डेंग्यू, टाइफाइड, मलेरियासारख्या आजारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील नागरिक नियमितपणे मनपाचे कर भरत असताना त्यांना महापालिकेतर्फे सुविधा पुरविण्यात येत नाहीत.
महापालिकेकडे शहर स्वच्छता व औषध फवारणीसाठी पैसे नसल्याने भाजपातर्फे भीक मांगो आंदोलन करण्यात येणार आहे. निवेदनावर हरिप्रसाद गुप्ता, दीपक गायकवाड, शरद अहिरे, सुनीता कुलकर्णी, कुसूम बच्छाव, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष शाहीदखान इस्माईलखान, मदन गायकवाड, नीलेश कचवे, प्रल्हाद शर्मा आदि कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)
पर्समधून ५४ हजारांचा ऐवज लांबविला
नाशिक : मोबाइलवर बोलणाऱ्या महिलेच्या पर्समधून दोघा चोरट्यांनी ५४ हजारांचा ऐवज चोरून नेला. सिन्नर फाटा खर्जुलनगर येथील गजानन पार्क येथे राहणाऱ्या स्नेहल गोरडिया (३०) या आपल्या बहिणीसह मंगळवारी सायंकाळी दुचाकीवर (एमएच १५, डीटी १२४८) नाशिक-पुणे महामार्गे नाशिकरोडकडे येत होत्या. स्नेहल गोरडिया यांच्या बहिणीचा फोन आला असता त्यांनी नेहरूनगर येथे रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करून मोबाइलवर बोलत होत्या. यावेळी मोटारसायकलवर आलेल्या दोघा चोरट्यांनी स्नेहल गोरडिया यांच्या पर्समधील ४ हजार रुपये रोख व ५० हजारांचे दागिने व काही कागदपत्रे असा सुमारे ५४ हजारांचा ऐवज नजर चुकवून हातोहात चोरून नेला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Malegaonkar's health hazard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.