मालेगावच्या वऱ्हाडाच्या बसला गुजरातमध्ये अपघात; ४ ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 15:58 IST2021-02-05T15:52:06+5:302021-02-05T15:58:22+5:30
मालेगाव : शहरातील शब्बीरनगर भागातील गुजरातमध्ये विवाह सोहळ्यासाठी गेलेल्या वऱ्हाडाच्या बसला तापी जिल्ह्यात भीषण अपघात झाला असून यात मालेगावचे चार जण ठार झाले.

मालेगावच्या वऱ्हाडाच्या बसला गुजरातमध्ये अपघात; ४ ठार
मालेगाव : शहरातील शब्बीरनगर भागातील गुजरातमध्ये विवाह सोहळ्यासाठी गेलेल्या वऱ्हाडाच्या बसला तापी जिल्ह्यात भीषण अपघात झाला असून यात मालेगावचे चार जण ठार झाले. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गुजरात राज्यात तापी जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे हा भीषण अपघात झाला. गुजरात राज्यातील व्यारा - बाजीपुरा राष्ट्रीय महामार्गावर वालोद गावाजवळ हा अपघात झाला. यात अनेक जण जखमी झाले. अपघातात निम्मी लक्झरी बस कापली गेली आहे. शब्बीरनगर, हजारखोली परिसरातील वऱ्हाड सुरतकडे काल रात्री रवाना झाले होते. भरधाव वेगात जाणारी लक्झरी बस पार्क केलेल्या ट्रकवर जावून आदळली. यातील सात गंभीर जखमींना रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.