मालेगावचा पारा ४४.४ अंशावर; उन्हाचा प्रकोप वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2022 12:31 AM2022-05-01T00:31:35+5:302022-05-01T00:31:35+5:30
मालेगाव : शहर, परिसरात उन्हाचा प्रकोप वाढला आहे. शनिवारी यंदाच्या हंगामातील सर्वाधिक ४४.४ अंश सेल्सिअस एवढे उच्चांकी तापमान नोंदवले गेले. मे महिन्याच्या प्रारंभीच उन्हाचा तडाखा बसू लागला आहे. दिवसभर उष्णतेची लाट असल्याने नागरिक त्रस्त झाले.
ठळक मुद्देगेल्या महिनाभरापासून उन्हाच्या तीव्रतेत वाढ होत आहे.
मालेगाव : शहर, परिसरात उन्हाचा प्रकोप वाढला आहे. शनिवारी यंदाच्या हंगामातील सर्वाधिक ४४.४ अंश सेल्सिअस एवढे उच्चांकी तापमान नोंदवले गेले. मे महिन्याच्या प्रारंभीच उन्हाचा तडाखा बसू लागला आहे. दिवसभर उष्णतेची लाट असल्याने नागरिक त्रस्त झाले.
गेल्या महिनाभरापासून उन्हाच्या तीव्रतेत वाढ होत आहे. शहर, परिसरातील तापमान दिवसागणिक वाढतच आहे. उन्हाच्या तीव्रतेचा परिणाम बाजारपेठेवरही दिसून येत आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही उन्हाची काहिली वाढल्याने नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी टोपी, गॉगल, उपरणे आदींचा वापर करताना दिसत आहेत.