मालेगावची टेहरे चौफुली बनली मृत्यूचा सापळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:16 AM2021-06-09T04:16:34+5:302021-06-09T04:16:34+5:30
सोयगाव : मालेगाव शहरालगतची टेहरे चौफुली मृत्यूचा सापळा बनला असून, टेहरे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतूककोंडी झाल्याने वाहन ...
सोयगाव : मालेगाव शहरालगतची टेहरे चौफुली मृत्यूचा सापळा बनला असून, टेहरे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतूककोंडी झाल्याने वाहन चालकात संताप व्यक्त होत आहे. या भागात खड्ड्यात रस्ते की, रस्त्यात खड्डा अशी अवस्था झाली आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत असते. सुमारे चाळीस खेड्यांचा संपर्क रस्ता म्हणून हा रस्ता ओळखला जातो. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग व मालेगांव महापालिकेने रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
टेहरे चौफुली शहरातील तिसरी मोठी चौफुली आहे. रुंदीकरणासाठी जागा ही पुरेशी असून, अतिक्रमण समस्या नाही. येथे मोठ्या प्रमाणात अवजड व लहान वाहनांची रहदारी जास्त आहे. मागील चार वर्षांपासून नागरिक चौफुली विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. सद्यस्थितीत हॉटेल महाराजा ते हॉटेल मधुबनपर्यंत रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे, तसेच सकाळी व संध्याकाळी फिरण्यास जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. रस्त्यावरील खड्डे विकासामुळे वाहन चालक खड्ड्यातून वाचण्याच्या प्रयत्नात पादचारी बळी पडत आहेत. मुख्य टेहरे चौफुलीचे काम मागील दोन वर्षांपासून अतिशय निकृष्ट दर्जाचे चालू आहे. येथे मागील आठ महिन्यांपासून खडीकरण झालेले असून, पुढील डांबरीकरणाच्या कामाकडे पूर्ण दुर्लक्ष झालेले आहे. मालेगांव महापालिकेला या पश्चिम भागात चांगले उत्पन्न असून, १०० टक्के नळपट्टी व घरपट्टी वसुली आहे, तसेच येथे म.न.पा जलवहिनीतून गळती होत असून, मोठ्या प्रमाणात पाणी साचून चिखल होतो. वाहन चालक पडत आहेत. टेहरे चौफुलीचा विकास होणे गरजेचे आहे. चौफुलीच्या आजूबाजूस मोठ्या प्रमाणात उद्योग-व्यवसाय उदयास येत आहेत. म.न.पा.ने लवकरात लवकर टेहरे चौफुलीचे दर्जेदार काम करावी. पावसाळ्यात पाणी साचून चिखलाचा त्रास व इतर वेळी धुळीचा सामना वाहनचालकांना, पादचाऱ्यांना व आजूबाजूच्या व्यावसायिकांना करावा लागत आहे. प्रशासन दुर्लक्षाने टेहरे चौफुली विकासापासून वंचित आहे. (०८ टेहरे)
-------------------------
टेहरे चौफुलीचा विकास करण्याचा विसर प्रशासनाला पडला आहे. अतिशय निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. मागील आठ महिन्यांपासून खडीकरण झाले आहे, पण डांबरीकरणास पुढील पंचवार्षिकची वाट पाहावी लागेल, असं वाटतंय. चौफुली विकास निश्चितच शहराच्या विकासात मैलाचा दगड ठरेल यात दुमत नाही.
- श्याम बच्छाव, हॉटेल व्यावसायिक
===Photopath===
080621\08nsk_2_08062021_13.jpg
===Caption===
०८ टेहरे