मालेगावची संपदा मुंबईत बनलीय मेट्रोची पायलट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:14 AM2021-05-18T04:14:41+5:302021-05-18T04:14:41+5:30

मालेगावच्या मामको बँकेतील सेवानिवृत्त कर्मचारी अशोक शिंदे यांची ती कन्या. तिचे दहावीपर्यंतचे शिक्षण आरबीएच कन्या विद्यालयात, बारावी तिने ...

Malegaon's wealth Mumbai Metro pilot | मालेगावची संपदा मुंबईत बनलीय मेट्रोची पायलट

मालेगावची संपदा मुंबईत बनलीय मेट्रोची पायलट

googlenewsNext

मालेगावच्या मामको बँकेतील सेवानिवृत्त कर्मचारी अशोक शिंदे यांची ती कन्या. तिचे दहावीपर्यंतचे शिक्षण आरबीएच कन्या विद्यालयात, बारावी तिने मसगा महाविद्यालयात केले. त्यानंतर पुण्याच्या विद्यार्थी वसतिगृह कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयातून २०१५ मध्ये इलेक्ट्रिकल अभियंता म्हणून पदवी मिळवली. प्रारंभी अभियांत्रिकीची पुस्तके प्रसिद्ध करणाऱ्या टेकमॅकस प्रकाशनमध्ये काम केले. त्यानंतर विप्रो कंपनीत काम करीत असताना २०१९ मध्ये मुंबईत मेट्रोत अर्ज केला. पहिल्या तांत्रिक परीक्षेनंतर रेल्वेची आरडीएसओ परीक्षा संपदा उत्तीर्ण झाली. ऑक्टोबरमध्ये मुलाखत होऊन तिची पायलट म्हणून निवड झाली. सर्व परीक्षा आणि चाचण्या झाल्यानंतर डिसेंबरमध्ये ती रुजू झाली. अंधेरीतील मेट्रोच्या कारशेडमध्ये प्रशिक्षण पूर्ण झाले. तेथे दर आठवड्याला परीक्षा अन् मुलाखत होते. त्यानंतर लाईन ड्रायव्हिंग अंडरसुपरव्हीजनला पाठवले गेले. नंतर शेवटची मुलाखत झाली आणि सुरू झाला पायलट म्हणून तिच्या जीवनाचा प्रवास. आजवर ती निर्बंधांच्या या कठीण काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची वाहतूक करत असते.

इन्फो

पतीही मेट्रोच्याच सेवेत

संपदाचे पतीदेखील मेट्रोतच स्टेशन मास्टर म्हणून नोकरीस असल्याने फारसा त्रास झाला नाही. सासू, दीर असे चौकोनी कुटुंब, पती-पत्नी आठ तास कामावर असतात. सासरच्या लोकांचा पाठिंबा आहे म्हणूनच मी इथवर पोहोचल्याची भावना संपदा व्यक्त करते. आणखी उच्च पदावर काम करण्याची संपदाची इच्छा आहे. मेट्रो अत्यावश्यक सेवा असल्याने मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करते. ट्रेन पायलटमध्ये एकटी मुलगी असल्याने सर्व सहकारी सांभाळून घेतात. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचे काम आम्ही करत असल्याचे संपदा शिंदे यांनी सांगितले.

फोटो- १७ संपदा मेट्रो

===Photopath===

170521\17nsk_19_17052021_13.jpg

===Caption===

फोटो- १७ संपदा मेट्रो 

Web Title: Malegaon's wealth Mumbai Metro pilot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.