मालेगावी दिव्यांगांची धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 11:25 PM2020-03-17T23:25:27+5:302020-03-17T23:28:04+5:30
मालेगाव : म्हाळदे शिवारातील घरकुल योजनेत पाच टक्के घरकुलांचा लाभ देण्यात यावा, पाच टक्केनुसार व्यापारी गाळे उपलब्ध करून द्यावेत, शासकीय कार्यालयांमध्ये रॅम्पची सोय करून द्यावी यासह विविध मागण्यांप्रश्नी दिव्यांग एज्युकेशन अॅण्ड वेल्फेअर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : म्हाळदे शिवारातील घरकुल योजनेत पाच टक्के घरकुलांचा लाभ देण्यात यावा, पाच टक्केनुसार व्यापारी गाळे उपलब्ध करून द्यावेत, शासकीय कार्यालयांमध्ये रॅम्पची सोय करून द्यावी यासह विविध मागण्यांप्रश्नी दिव्यांग एज्युकेशन अॅण्ड वेल्फेअर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी मनपा उपायुक्त नितीन कापडणीस यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
शहरातील दिव्यांग संस्थेला कार्यालयासाठी महापालिकेने जागा द्यावी, बेरोजगार दिव्यांगासाठी मनपा व्यापारी गाळे उपलब्ध करून द्यावेत, शासकीय कार्यालयांमध्ये रॅम्पची सुविधा नसल्याने दिव्यांगाचे हाल होत आहेत. दिव्यांगाना पेन्शन देण्यात यावी यासह विविध मागण्यांप्रश्नी सोमवारी दिव्यांगांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन केले. आंदोलनात मुद्दसीर राजा, नईम अहमद अन्सारी, अॅड. सालीक अन्सारी, कदीर खान, समीर शेख आदींसह दिव्यांग सहभागी झाले होते.