मालेगावी शिवसेनेचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 11:32 PM2019-10-24T23:32:13+5:302019-10-25T00:25:47+5:30

Maharashtra Assembly Election 2019 मालेगाव बाह्य मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार दादा भुसे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांत विजयाचा आत्मविश्वास असल्याने दोन दिवसांपासूनच शिवसेना संपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांकडून जल्लोषाची जय्यत तयारी करण्यात आली होती.

 Malegavi Shiv Sena cheers | मालेगावी शिवसेनेचा जल्लोष

मालेगावी शिवसेनेचा जल्लोष

Next

मालेगाव : मालेगाव बाह्य मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार दादा भुसे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांत विजयाचा आत्मविश्वास असल्याने दोन दिवसांपासूनच शिवसेना संपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांकडून जल्लोषाची जय्यत तयारी करण्यात आली होती.
दादा भुसे यांनी विजयी चौकार मारताच समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला. जल्लोष साजरा करतानाच विजयी उमेदवार दादा भुसे यांनी केलेले संयमित भाषण आणि तालुकावासीयांना दिलेला विकासाचा शब्द हा मतदारांच्या अपेक्षा वाढवून गेला.
एकहाती विजय मिळेल अशी अपेक्षा असताना केवळ महिनाभरात मैदानात उतरलेल्या प्रतिस्पर्धी कॉँग्रेसचे उमेदवार डॉ. तुषार शेवाळे यांना झालेले मतदानही दुर्लक्षित करून चालणार नाही. डॉ. शेवाळे यांनी तुल्यबळ लढत दिल्याने निवडणुकीत रंग भरला. शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाबाहेर बुधवारी दिवसभर पाऊस सुरू असतानाही व्यासपीठ उभारण्यापासून कार्यकर्त्यांसाठी करण्यात येणारी आसनव्यवस्था लक्ष वेधून घेत होती.
तालुकाभरातून आलेले समर्थक आणि शिवसेना-भाजप पदाधिकारी तसेच भेटायला येणाऱ्या हितचिंतकांसाठी चहा, पाणी आणि नास्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. समर्थक कार्यकर्त्यांच्या विजयी मेळाव्यात व्यासपीठावरील पदाधिकाऱ्यांसमोर जमिनीवर बसलेल्या दादा भुसे यांनी आपण चौथ्या विजयानंतरही आकाशात नसून आपले पाय जमिनीवरच असल्याचे सांगत सर्व पदाधिकाºयांना बरोबर घेऊन शहर- तालुक्याच्या विकासासाठी झोकून देऊ, असे आश्वासन दिले.
याचवेळी भुसे यांनी ग्रामविकास राज्यमंंत्रिपदावर काम करीत असताना केलेली कामे आणि मालेगाव जिल्हानिर्मितीसह अपूर्ण असलेली कामे पूर्ण करण्यास प्राधान्य देऊ, असे सांगितले.
एकंदरीत राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्याने शहरासह तालुक्यातील विकासकामांना गती देण्यात यश येईल. दरम्यान, शहरासह तालुक्यातून शिवसेनेचा चौकार ठोकून विजय मिळविलेल्या दादा भुसे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा संपूर्ण तालुक्यातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
कॅम्प रस्त्याला आले यात्रेचे स्वरूप
मालेगाव : मालेगाव मध्य आणि बाह्य मतदारसंघातील उमेदवारांची मतमोजणी सुरू असल्याने कॅम्प रस्त्यावर सर्वच पक्षांच्या समर्थकांनी गर्दी केल्याने यात्रेचे स्वरूप आले होते. भगवे आणि हिरवे झेंडे घेऊन कार्यकर्त्यांनी कॅम्प रस्त्यावर एकच गर्दी केल्याने पोलिसांना वाहतुकीचे नियोजन करताना सर्कस करावी लागली. मालेगाव कॅम्प रस्त्यावरील रस्ते अडविण्यात आले होते. त्यामुळे वाहनचालकांनी आपली वाहने इतर मार्गाने वळविण्यात आली होती. त्यामुळे छावणी पोलीस ठाण्यापासून न्यायालय आवारापर्यंत दुचाकी लावण्यात आल्या होत्या.

Web Title:  Malegavi Shiv Sena cheers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.