मालेगावी श्रावणबाळ अनुदान पुन्हा सुरू होणार
By admin | Published: September 11, 2014 10:09 PM2014-09-11T22:09:38+5:302014-09-12T00:10:59+5:30
मालेगावी श्रावणबाळ अनुदान पुन्हा सुरू होणार
नाशिक : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्टÑवादीने उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत कॉँग्रेसचा उमेदवार पराभूत केल्याने जिल्हा परिषदेतील कॉँग्रेस-राष्टÑवादीच्या आघाडीत बिघाडी झाली. राष्टÑवादीने गद्दारी केल्याचा आरोप कॉँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे, तर राष्टÑवादीने स्थानिक निवडणुकांमध्ये असे होतच राहते, असे सांगत कॉँग्रेसला एकप्रकारे झटका दिला आहे. आमदार माणिकराव कोकाटे व पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यात छुपा संघर्ष असल्याने सातत्याने या ना त्या कारणाने कॉँग्रेस व राष्टÑवादी एकमेकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत असते. त्यातच जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्टÑवादी व कॉँग्रेस वेगवेगळ्या ठिकाणी सहलीला गेल्याने आघाडी टिकणार काय, हाच मोठा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. निवडणुकीच्या आदल्या दिवशी कॉँग्रेस व राष्टÑवादीचे सदस्य एक्स्प्रेस इन या हॉटेलमध्ये एकत्र आले; मात्र त्यांची संयुक्त बैठक झालीच नाही. त्यानंतर आमदार माणिकराव कोेकाटे यांनी केरू पवार यांच्या उमेदवारीसाठी व आमदार निर्मला गावित यांनी अॅड. संदीप गुळवे यांच्या उमेदवारीसाठी निरीक्षक आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडे आक्रमकपणे मागणी केली. शिवसेना व भाजपाचे सदस्य सभागृहात न आलेले पाहून राष्टÑवादीने संधी साधत उपाध्यक्षपदासाठी व्यूहरचना आखली. मतदान झालेच तर संख्याबळ ३१ होत असल्याने कॉँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करण्याची खेळी केली. त्यानुसार निवडणूक होऊन कॉँग्रेसचे उमेदवार केरू पवार अपेक्षेनुसार पराभूत झाले. निवडणुकीनंतर कॉँग्रेसच्या नेत्यांनी राष्टÑवादीवर गद्दारीचे आरोप करीत याचे परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्णातच नव्हे तर राज्यात राष्टÑवादीला भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)