मालेगावी राजकीय पदाधिकारी-पोलिसात वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 11:51 PM2020-02-07T23:51:28+5:302020-02-08T00:13:31+5:30
मालेगाव मध्य : लहान मुलांच्या किरकोळ भांडणावरुन आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व माजी महापौर यांच्यात शुक्रवारी रात्री नऊ ...
मालेगाव मध्य : लहान मुलांच्या किरकोळ भांडणावरुन आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व माजी महापौर यांच्यात शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास शाब्दिक चकमक उडाली. यामुळे आझादनगर पोलीस ठाण्याबाहेर जमाव जमल्याने काही काळ निर्माण झालेली तणावसदृश परिस्थिती निवळली.
नेहरू चौकात मुलांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी मुलांना पोलीस ठाण्यात आणले. यातील एक राजकीय नेत्याचा मुलगा असल्याने ‘त्या’ नेत्याने पोलीस ठाणे गाठले. निरीक्षक दिलीप कुमार पारेकर चौकशी करीत असतांनाच वडीलांनी मुलास मारले. त्यातुन गैरसमज झाल्याने निरीक्षक व माजी महापौर यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. या प्रकाराची माहिती नागरिकांना मिळाल्यानंतर पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले यांनी घटनास्थळी धाव घेत जमावाची समजूत काढली. तसेच स्थायी समिती सभापती डॉ. खालीद परवेझ, नगरसेवक एजाज बेग, नगरसेवक मुस्तकीम डिग्नीटी यांच्यासह राजकीय पदाधिकाऱ्यांनी हस्ताक्षेप केल्यानंतर या वादावर पडदा पडला.
या घटनेमुळे शहराच्या पूर्व भागात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती.