कला संगमातून उलगडला ‘मल्हार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 01:18 AM2019-08-26T01:18:58+5:302019-08-26T01:19:14+5:30
ज्या कलांना प्रमुख परफॉर्मिंग आर्ट म्हणून संबोधले जाते अशा गायन, वादन, नृत्य आणि दृककलेत येणाऱ्या चित्रकलेचा अनोखा संगम साधत ‘मल्हार’च्या सृजनात्मक छटांचे रविवारी सादरीकरण करण्यात आले.
नाशिक : ज्या कलांना प्रमुख परफॉर्मिंग आर्ट म्हणून संबोधले जाते अशा गायन, वादन, नृत्य आणि दृककलेत येणाऱ्या चित्रकलेचा अनोखा संगम साधत ‘मल्हार’च्या सृजनात्मक छटांचे रविवारी सादरीकरण करण्यात आले.
राधा भट यांच्या स्मृतीदिनानिमित्त गंगापुर रोड येथील कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा सभागृहात श्रीया गुणे पांडे यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्र मात नाशिक आणि मुंबई येथील १३ महिला कलाकारांनी त्यांच्या कलांचा अविष्कार सादर केला. मल्हार या अनोख्या कार्यक्र माची सुरूवात देवश्री नवघरे -भार्गवे यांच्या जयपूर घराण्याच्या शास्त्रीय गायकीने झाला. यावेळी त्यांनी गौड मल्हार हा राग सादर केला. त्यानंतर मानसी केळकर आणि श्वेता चंद्रात्रे यांनी कथक नृत्यातुन रूपक ताल सादर करत रसिकांची मने जिंकली.
कार्यक्र माच्या अखेरच्या टप्यात दुर्वाक्षी पाटील, मधुश्री वैद्य आणि आकांक्षा कोठावदे यांनी एकतालातील विविध बंदीशीचे सादरीकरण करत ‘बाजे मुरलीया बाजे’ या भजनावर नृत्य सादर केले. यावेळी वैष्णवी भडकमकर (तबला) आणि कृपा परदेशी (संवादिनी) यांनी साथसंगत केली. या कार्यक्र मात डॉ भैरवी शुक्ल (मुंबई) यांनी कॅनव्हासवर विविध कलाकृती रेखाटत सगळयांचेच लक्ष वेधले. कार्यक्र मास ज्येष्ठ नृत्यांगना रेखा नाडगौडा, आदिती नाडगौडा - पानसे, विद्या देशपांडे, संजीवनी कुलकर्णी, विद्या देशपांडे, मंजिरी असनारे-केळकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पियु आरोळे यांनी केले तर केतकी चंद्रात्रे यांनी आभार मानले.