मल्हार हिल विद्यालयाचा ‘शाळा पालकाच्या दारी’ उपक्र म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 11:09 PM2020-09-10T23:09:17+5:302020-09-11T00:49:59+5:30

औंदाणे : बागलाण तालुक्यातील भाक्षी येथील आई आशापुरी सामाजिक व शैक्षणिक संस्था संचलित मल्हार हिल कॅम्पसमधील प्राथमिक विद्यामंदिर तर्फे कोरोना काळात शारीरिक अंतर राखत ’शाळा पालकाच्या दारी’ या उपक्र मास प्रारंभ केला आहे.

Malhar Hill Vidyalaya's 'School Parent's Door' initiative m | मल्हार हिल विद्यालयाचा ‘शाळा पालकाच्या दारी’ उपक्र म

मल्हार हिल विद्यालयाचा ‘शाळा पालकाच्या दारी’ उपक्र म

googlenewsNext
ठळक मुद्देशिक्षण चालू राहावे म्हणून विविध उपक्र म

औंदाणे : बागलाण तालुक्यातील भाक्षी येथील आई आशापुरी सामाजिक व शैक्षणिक संस्था संचलित मल्हार हिल कॅम्पसमधील प्राथमिक विद्यामंदिर तर्फे कोरोना काळात शारीरिक अंतर राखत ’शाळा पालकाच्या दारी’ या उपक्र मास प्रारंभ केला आहे.
कोरोना संक्र मणाचा वाढत वेग बघता खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद असल्या तरी विद्यालयाने शिक्षण चालू राहावे म्हणून विविध उपक्र म हाती घेतले. शाळेत शिकणारे विद्यार्थी ग्रामीण भागातील असून ते आॅनलाईन शिक्षणापासून वंचित राहत होते; म्हणून शाळा पालकांच्या घरी पोहचली. या भेटीत विद्यार्थ्यांचा अभ्यास तपासला गेला व त्यांना स्वयंअध्ययनासाठी मार्गदर्शन केले. तसेच वैयिक्तक सुरिक्षतता व फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांविषयी मार्गदर्शन केले. या उपक्र माला पालकांनी प्रतिसाद दिल्याबद्दल तसेच या दरम्यान त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल सर्व पालकवर्गाचे शाळा विकास अधिकारी सुरेश येवला यांनी आभार मानले. मुख्याध्यापक पंकज दातरे, संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र कोठावदे, गट शिक्षण अधिकारी तानाजी घोंगडे, के.पी. पगार, शिक्षण विस्तार अधिकारी बागलाण, केंद्र प्रमुख हिरालाल बधान, किरण सोनवणे, नंदिकशोर शेवाळे यांचे शिक्षकांना मार्गदर्शन लाभले.
फोटो :(10औंदाणे1)

 

Web Title: Malhar Hill Vidyalaya's 'School Parent's Door' initiative m

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.