माळी समाजाची राजकीय कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:33 AM2017-10-30T00:33:56+5:302017-10-30T00:34:04+5:30

फुले, शाहू, आंबेडकरांच्या समतावादी विचारांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात ओबीसींसह माळी समाजाची राजकीय तथा सामाजिक कोंडी करण्याचा घाट घातला जात असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत संभाजी बोरुडे यांनी केले आहे. राज्याच्या सत्तेतही समाजाला उपेक्षित ठेवण्यात आले असून, मंत्रिमंडळात माळी समाजाच्या कोणत्याही प्रतिनिधीला स्थान देण्यात आले नसल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

 Mallya's political stance | माळी समाजाची राजकीय कोंडी

माळी समाजाची राजकीय कोंडी

Next

नाशिक : फुले, शाहू, आंबेडकरांच्या समतावादी विचारांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात ओबीसींसह माळी समाजाची राजकीय तथा सामाजिक कोंडी करण्याचा घाट घातला जात असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत संभाजी बोरुडे यांनी केले आहे. राज्याच्या सत्तेतही समाजाला उपेक्षित ठेवण्यात आले असून, मंत्रिमंडळात माळी समाजाच्या कोणत्याही प्रतिनिधीला स्थान देण्यात आले नसल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
नाशिक जिल्हा माळी समाज नियोजन समितीतर्फे एक दिवस समाजासाठी, एक दिवस भविष्यासाठी एक दिवस अस्तित्वासाठी ही त्रिसूत्रीसमोर ठेवून द्वारका परिसरातील माळी मंगल कार्यालयात माळी समाज चिंतन आणि स्नेहमेळाव्यात ते रविवारी (दि. २९) बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी उपमहापौर प्रथमेश गिते, आमदार देवयानी फरांदे, नगरसेवक सत्यभामा गाडेकर, सुनील मोरे, बाजीराव तिडके, अविनाश ठाकरे, दीपक मंडलिक, सुनीता गिते, अनिल जाधव, चंद्रकांत बागुल, अविनाश ठाकरे, आदी उपस्थित होते. संभाजी बोरुडे म्हणाले, संत शिरोमणी सावता महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले, क्र ांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा समृद्ध वारसा माळी समाजास लाभला आहे. समाजात साक्षरतेचा प्रसार करण्यात आणि सामाजिक, राजकीय योगदानात मोलाची भूमिका बजावणाºया माळी समाजात एकजुटीची भावना, वैचारिक प्रगती व्हावी आणि समाज विधायक उपक्र म राबविण्यासाठी आपसातील मतभेद दूर करून समाजाने संघटित होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली, तर सामाजाच्या प्रगतीच्या नवनवीन वाटा शोधण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे मत संभाजी पगारे यांनी व्यक्त केली.  यावेळी चर्चासत्रात सद्यस्थितीला समाज व्यवस्थेमध्ये माळी समाजाचे स्थान, माळी समाजाचे स्वरूप, समाजबांधवांसाठी उपलब्ध असलेल्या प्रगतीच्या विविध वाटा, माळी समाजापुढील विविध क्षेत्रांतील आव्हाने यांसारख्या विविध महत्त्वाच्या पैलूंसह ‘राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रांतील माळी समाजाचे स्थान आदी विषयांवर समाजबांधवांनी त्यांची मते मांडली. दरम्यान, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले रचित विविध गीतांचा आविष्कारही यावेळी सादर करण्यात आला. यावेळी राज्यभरातून माळी समाजबांधव उपस्थित होते. प्रास्ताविक अनिल जाधव यांनी केले. सूत्रसंचालन मोहन माळी यांनी केले. राका माळी यांनी आभार मानले.
छगन भुजबळांची पाठराखण
माळी समाज चिंतन, स्नेहमेळाव्यात माळी समाजाकडून माजी मंत्री छगन भुजबळ यांची पाठराखण करीत त्यांच्यावर राजकीय व सामाजिक द्वेशातूनच कारवाई होत असल्याचा दावा करण्यात आला. यापूर्वीही शहरात माळी समाजाने अनेक बैठका घेऊन भुजबळांना पाठिंबा दिला आहे.

Web Title:  Mallya's political stance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.