राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मालपाणी महाविद्यालयास फिरता करंडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 05:34 PM2019-01-16T17:34:55+5:302019-01-16T17:35:21+5:30
सिन्नर तालुक्यातील दोडी येथील ब्रम्हानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात संस्थेचे संस्थापक स्वर्गीय दादापटील गणपत केदार यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत संगमनेर येथील मालपाणी महाविद्यालयने फिरता करंडक पटकावला.
उदघाटन आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग केदार होते. व्यासपीठावर युवानेते उदय सांगळे, नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष शैलेश नाईक, के. पी. आव्हाड, राजाराम आव्हाड, देवराम केदार, किसन आव्हाड, रमेश पाटील, बाळू विंचू आदि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्राचार्य डॉ. जालिंदर मुर्तडक यांनी प्रास्तविक केले. तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवून उपस्थित सर्व पाहुण्यांनी शब्दरूपी सत्कार स्विकारला. वक्तृत्व करंडक स्पर्धेत नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, आदि जिल्ह्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. मालपाणी महाविद्यालयास फिरता करंडक राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत साताऱ्याच्या किरण किर्तीकर याने प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय सोहम मांडे, तृतीय अमोल गट्टे व उत्तेजनार्थ ईश्वर आव्हाड यांना मिळाला. संगमनेर येथील मालपाणी महाविद्यालयाने फिरता करंडक घेतला. स्पर्धेत परीक्षक म्हणून प्रा. कैलास गोपाळे, प्रा. डॉ. बाळासाहेब मुरादे, प्रा. राजेंद्र जोरवर यांनी काम पाहिले.