औंदाणेत गाळेवाटपात गैरव्यवहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 12:02 AM2017-08-14T00:02:44+5:302017-08-14T00:03:21+5:30
सटाणा : नव्याने लाभार्थी निवडण्याचे आदेश सटाणा : जिल्हा ग्रामीण विकास योजनेंतर्गत औंदाणे ग्रामपंचायतीने बांधलेल्या व्यापारी गाळ्यांच्या वाटपात बोगस लाभार्थी दाखवून गैव्यवहार केल्याप्रकरणी बागलाणचे सहायक गटविकास अधिकारी महेंद्र कोर यांनी गाळे सील करून दि. १५ आॅगस्ट रोजी होणाºया ग्रामसभेत नव्याने लाभार्थी निवडण्याचे आदेश ग्रामसेवकाला दिले आहेत.
सटाणा : नव्याने लाभार्थी निवडण्याचे आदेश
सटाणा : जिल्हा ग्रामीण विकास योजनेंतर्गत औंदाणे ग्रामपंचायतीने बांधलेल्या व्यापारी गाळ्यांच्या वाटपात बोगस लाभार्थी दाखवून गैव्यवहार केल्याप्रकरणी बागलाणचे सहायक गटविकास अधिकारी महेंद्र कोर यांनी गाळे सील करून दि. १५ आॅगस्ट रोजी होणाºया ग्रामसभेत नव्याने लाभार्थी निवडण्याचे आदेश ग्रामसेवकाला दिले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ता तुषार खैरनार यांनी उपोषण केल्यानंतर झालेल्या चौकशीअंती हा आदेश देण्यात आला. दरम्यान, बोगस लाभार्थी दाखवून काही सदस्यांनी कुटुंबासाठी गाळ्यांचा लाभ घेतल्याने त्यांना आगामी आॅक्टोबरमध्ये होऊ घातलेली ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. दि. ३१ मे २००९ व दि. २ आॅक्टोबर २०१० च्या ग्रामसभेत अनुक्रमे ९४ व ४५ ग्रामस्थांची उपस्थिती होती. या अल्प उपस्थितीमुळे गणपूर्तीचा अभाव असतानादेखील ग्रामपंचायत प्रशासनाने गाळे बांधकामाचा ठराव करताना गरजू व अपंग व्यक्तींना व्यवसायासाठी गाळे बांधण्याच्या ठरावाला मंजुरी दिली. या गैरव्यवहार प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याबरोबरच नव्याने गाळे वाटप करावेत या मागणीसाठी माहिती अधिकार कार्यकर्ता तुषार खैरनार यांनी उपोषण केले होते. याची बागलाणचे सहायक गटविकास अधिकारी महेंद्र कोर यांनी चौकशीअंती गाळ्यांना सील करण्याचे आदेश दिले. त्यानंतर १५ आॅगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर औंदाणे येथे ग्रामसभा घेऊन योग्य लाभार्थींची निवड करावी आणि तो अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करावा, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. या गैरव्यवहारात औंदाणे ग्रामपंचायतीचे काही आजी-माजी सदस्य अडकण्याची शक्यता असून, स्वत: व कुटुंबाच्या लाभासाठी त्यांनी पदाचा गैरवापर केल्याचे चौकशीदरम्यान आढळून आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे येत्या आॅक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत त्या सदस्यांना निवडणूक लढविण्यास तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. या योजनेचा प्रस्ताव सादर करताना अम्मा भगवान महिला बचत गट, यशवंत महिला बचत गट, सप्तशृंगी महिला बचतगट यांना कागदोपत्री गाळे वितरित करण्यात आले आहेत. परंतु या लाभार्थींनी जादा भाडेपट्ट्याने दुसºया व्यावसायिकांना गाळे दिले आहेत. यामुळे ग्रामपंचायतीचे आर्थिक नुकसान होत आहेग़्रामपंचायतीला नाममात्र भाडे औंदाणे ग्रामपंचायतअंतर्गत येणाºया यशवंतनगर येथे जिल्हा ग्रामीण विकास योजनेंतर्गत सन २०१०-११ मध्ये व्यापारी गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले. गाळे वाटप करताना लाभार्थींची निवड ही बांधकामाचा प्रस्ताव विचाराधीन असतानाच झाले असते. परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने गाळे वाटप करताना जी कारणे कागदोपत्री दाखवली आहेत त्यापैकी कोणताही लाभार्थी या गाळ्यांमध्ये स्वत: व्यवसाय करीत नसून दुसºया व्यावसायिकांना जादा भाडे आकारून दिले होते. ग्रामपंचायतीला मात्र नाममात्र भाडे दिले गेले .