डोंबिवलीतील स्फोटप्रकरणी मालती मेहता नाशिकमध्ये अटकेत
By दिनेश पठाडे | Updated: May 24, 2024 16:36 IST2024-05-24T16:35:34+5:302024-05-24T16:36:12+5:30
मालती मेहता या अमुदान कंपनीच्या मालक असून बॉयलर स्फोटप्रकरणी त्यांच्यासह मलय मेहतांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंबिवलीतील स्फोटप्रकरणी मालती मेहता नाशिकमध्ये अटकेत
दिनेश पाठक, नाशिक : डोंबिवली एमआयडीसीमध्ये झालेल्या स्फोटप्रकरणी मुख्य आरोपी मालती मेहता यांना नाशिकपोलिसांनी शहरातील मेहेरधाम परिसरातील पेठ राेड येथून ताब्यात घेतले आहे. सूनेच्या भावाकडे त्या अटक टाळण्यासाठी लपून बसल्या होत्या. मालती मेहता या अमुदान कंपनीच्या मालक असून बॉयलर स्फोटप्रकरणी त्यांच्यासह मलय मेहतांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोंबिवलीतील रिअॅक्टर स्फोटात ११ जण मृत झाले होते. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. डोंबिवली येथील एमआयडीसीतील अमुदान स्फोटातील मुख्य आरोपी मालती मेहता या नाशिकला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी रात्रीपासून नाशिक क्राईम ब्रांच युनिट एक आणि आणि ठाणे क्राईम ब्रांच पोलिसांनी संयुक्त पद्धतीने कारवाई करत त्यांना अटक केली आहे.
डोंबिवलीमध्ये स्फोट झाल्यानंतर अमुदान कंपनीचे मालक फरार झाले होते. त्यांच्या मोबाईलचे लोकेशन पोलिसांनी तपासले. ते नाशिक येथे असल्याची पक्की खबर मिळाली. त्यानुसार ठाणे पोलिसांचे पथक नाशिक पोलिसांच्या संपर्कात होते. डोंबिवलीतील कंपनीत स्फोट झाल्यानंतर मुख्य आरोपी मालती मेहता या नाशिकमध्ये पोहोचल्या होत्या. त्यांनी त्यांच्या नातेवाईकाच्या घरी आश्रय घेतला होता. त्यांच्या अटकेची माहिती पंचवटी पाेलिस ठाण्याचे वरिेष्ठ पाेलिस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली. वैद्यकीय तपासणी करून मालती मेहता यांना ठाणे पाेलिसांकडे सोपविण्यात आले.