मालट्रक अन् आयशरचा अपघात, लोकांनी ट्रकमधील साखर नेली पळवून

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 11:08 AM2021-07-10T11:08:41+5:302021-07-10T11:09:45+5:30

मालट्रकमध्ये साखर तर आयशरमध्ये मीठ भरलेले होते. या दोन्ही वाहनांची जोरदार धडक बसल्याने अपघात झाला.

Maltruck and Eicher accident, sugar nelly escaping from the truck in nashik | मालट्रक अन् आयशरचा अपघात, लोकांनी ट्रकमधील साखर नेली पळवून

मालट्रक अन् आयशरचा अपघात, लोकांनी ट्रकमधील साखर नेली पळवून

googlenewsNext
ठळक मुद्देअपघात झाल्यानंतर पेठरोडवरील अंबिकानगर झोपडपट्टीतील रहिवाशांनी साखरेवर डल्ला मारला.

नाशिक : पेठरोडवरील शरदचंद्र पवार बाजार समिती लगत सिग्नलवर मालट्रक आणि आयशरचा या मालवाहू वाहनांचा शनिवारी पहाटेच्या सुमाराला भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक व क्लिनर जखमी झाले आहे. 

मालट्रकमध्ये साखर तर आयशरमध्ये मीठ भरलेले होते. या दोन्ही वाहनांची जोरदार धडक बसल्याने अपघात झाला. अपघातग्रस्तांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. अपघात झाल्यानंतर पेठरोडवरील अंबिकानगर झोपडपट्टीतील रहिवाशांनी साखरेवर डल्ला मारला. साखर पिशव्यांमधून भरुन घरी नेण्यात आली. दरम्यान, रस्त्याच्या मध्यभागी वाहने पलटी झाल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

Web Title: Maltruck and Eicher accident, sugar nelly escaping from the truck in nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.