ममदापूरला विविध क्षेत्रातील मान्यवरांचे सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:12 AM2018-04-24T00:12:57+5:302018-04-24T00:12:57+5:30

येथील छत्रपती मित्रमंडळ यांच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचे सत्कार समारंभाचे आयोजन रविवारी येथील शनी मंदिर परिसरात आयोजित करण्यात आले होते.

 Mamadapur felicitates dignitaries in various fields | ममदापूरला विविध क्षेत्रातील मान्यवरांचे सत्कार

ममदापूरला विविध क्षेत्रातील मान्यवरांचे सत्कार

Next

ममदापुर : येथील छत्रपती मित्रमंडळ यांच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचे सत्कार समारंभाचे आयोजन रविवारी येथील शनी मंदिर परिसरात आयोजित करण्यात आले होते.  या कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी बाबा डमाळे हे होते. येथील बाळासाहेब दाणे यांची खरवंडी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल, उपक्र मशील शिक्षक देविदास जानराव यांचा सामाजिक कार्यात सिक्र य सहभाग तर देविदास गुडघे यांची छावा संघर्ष माथाडी व जनरल कामगार युनियन च्या नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी निवडझाल्याबद्दल, ममदापूरचे रमेश जानराव यांची नुकतीच धनगर समाज क्र ांती सेवा संघाच्या युवा तालुकाअध्यक्षपदी निवडीबद्दल सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांचे सत्कार बाबा डमाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी देविदास गुडघे, देविदास जानराव यांनी मनोगत व्यक्त केले. बाळासाहेब दाणे यांनी सत्काराचे फलित सांगितले. सत्कारामुळे जबाबदार्या वाढतात व पाठीवर थाप मारल्यामुळे नक्कीच प्रेरणा मिळते असेही बाळासाहेब दाणे म्हणाले. तर आपल्या अध्यक्षीय भाषणात डमाळे यांनी छत्रपती मंडळ राबवत असलेले विविध उपक्र म नक्कीच दिशादर्शक ठरत आहेत. गावाचा विकास साधायचा असेल तर हेवेदावे विसरून गावातील तरु णांनी एकत्र येऊन गाव विकास साधावा, समाजात टिकायचे असेल तर अपमान सहन करायची ताकद ठेवायला हवी. सहनशिलतेच्या जीवावर आपण आपली प्रगती करू शकतो. असे डमाळे यांनी सांगितले. यावेळी बाबा डमाळे , पप्पू जानराव, एकनाथ भालेराव, योगेश उशीर, राजेंद्र रायभान काळे, प्रथमेश पगारे, अनिल बैरागी, भाऊलाल सदिगर, आबासाहेब केरे, छत्रपती मित्र मंडळाचे अध्यक्ष अनिल गुडघे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर केरे, डॉ. राऊत, सयाजी गुडघे, राहुल वाघ, नवनाथ अिहरे, योगेश जानराव, सनी कुलकर्णी, प्रथमेश पगारे, लक्ष्मण वैद्य, धनंजय गिडगे, अरु न साबळे, मिच्छद्र साबळे, रामेश्वर साबळे आदीसह छत्रपती मित्रमंडळाचे कार्यकर्ते व गावातील तरु ण व जेष्ठ ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्र माचे सूत्रसंचालन दिनेश राऊत यांनी केले.

Web Title:  Mamadapur felicitates dignitaries in various fields

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक