डोक्यात दगड घालून नाशिकरोडला इसमाची हत्त्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 04:54 PM2018-05-10T16:54:37+5:302018-05-10T16:54:37+5:30

अज्ञात मारेकऱ्यांच्या शोधात पोलीस पथक रवाना करण्यात आले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

man assassination in Nashik Road with stones in his head | डोक्यात दगड घालून नाशिकरोडला इसमाची हत्त्या

डोक्यात दगड घालून नाशिकरोडला इसमाची हत्त्या

Next
ठळक मुद्देडॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केलेअज्ञात मारेकऱ्यांच्या शोधात पोलीस पथक रवाना खून कोणी केला व कोणत्या कारणासाठी केला हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

नाशिक : नाशिकरोड परिसरातील रोकडोबावाडी भागात अज्ञात लोकांनी पहाटेच्या सुमारास एका ४२ वर्षीय इसमाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोकडोबावाडी येथील रहिवासी बाळू दिनकर दोंदे यांचा अज्ञात लोकांनी डोक्यात दगड घालून खून केल्याचे समोर आले आहे. गंभीररीत्या जखमी झालेले दराडे मदतीची याचना करताना पोलिसांना पहाटेच्या सुमारास रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर आढळून आले. पोलिसांनी त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलविले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. दोंदे हे पत्नीसमवेत रोकडोबावाडीत राहत होते. त्यांनी आंबेडकर रोडवर काही दिवसांपूर्वी भाडेतत्त्वावर चपलांचे दुकान चालविण्यास घेतले होते, असे पोलीस तपासात समोर आले आहे. मात्र दोंदे यांचा खून कोणी केला व कोणत्या कारणासाठी केला हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. अज्ञात मारेकऱ्यांच्या शोधात पोलीस पथक रवाना करण्यात आले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या पथकासह पोलीस उपआयुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहायक आयुक्त मोहन ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पुरावे शोधण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या काही सुगाव्यांवरून पोलीस मारेकºयांचा शोध घेत आहेत. दोंदे यांच्याशी वाद घालून काही अज्ञात लोकांनी त्यांच्या डोक्यात दगड टाकून त्यांना मारण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर नाशिकरोड परिसरात सर्वत्र सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. गुन्हे शोध पथकालाही याबाबत माहिती देण्यात आली असून, पथक त्या दिशेने तपास करत आहे.

Web Title: man assassination in Nashik Road with stones in his head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.