गावठी कट्ट्यासह एक जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 01:04 AM2019-10-17T01:04:34+5:302019-10-17T01:05:55+5:30

विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत गुन्हेगारीवर अंकुश निर्माण करता यावा, यासाठी पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये मंगळवारी (दि.१५) रात्री पोलिसांकडून शहरात कोम्बिंग आॅपरेशन राबविले गेले. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या आदेशान्वये अचानक राबविलेल्या या मोहिमेत १३५ सराईत गुन्हेगारांची तपासणी करीत पोलिसांनी ८२ गुन्हेगारांवर कारवाई केली. तसेच सातपूर भागात एका गुन्हेगाराला गावठी कट्ट्यासह अटक केली.

A man with a knot in the neck | गावठी कट्ट्यासह एक जण ताब्यात

गावठी कट्ट्यासह एक जण ताब्यात

Next
ठळक मुद्देकोम्बिंग आॅपरेशन : ८२ सराईत गुन्हेगारांवर कारवाई

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत गुन्हेगारीवर अंकुश निर्माण करता यावा, यासाठी पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये मंगळवारी (दि.१५) रात्री पोलिसांकडून शहरात कोम्बिंग आॅपरेशन राबविले गेले. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या आदेशान्वये अचानक राबविलेल्या या मोहिमेत १३५ सराईत गुन्हेगारांची तपासणी करीत पोलिसांनी ८२ गुन्हेगारांवर कारवाई केली. तसेच सातपूर भागात एका गुन्हेगाराला गावठी कट्ट्यासह अटक केली.
विधानसभा निवडणूक अखेरच्या टप्प्यात पोहोचली असताना शहरात निवडणुकीचा ज्वर चांगलाच वाढला आहे. यामुळे पोलीस यंत्रणेवरदेखील कायदासुव्यवस्था टिकवून ठेवण्याची जबाबदारी तितकीच वाढली आहे. या पार्श्वभूमीवर गुजरात बॉर्डर पोलिसांसह दंगलनियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथकांच्या तुकड्यांसह विविध पोलीस ठाण्यात संचलन तसेच रंगीत तालीमदेखील घेतली जात आहे.
दरम्यान, नांदूर नाका, सिन्नर फाटा, म्हसरूळ गाव, राऊ हॉटेल परिसर, अंबड टी पॉइंट, मालेगाव स्टॅण्ड, काठे गल्ली, आनंदवली, नारायण बापूनगर, पाथर्डी फाटा, वडनेरगेट, भगूर यांसह शहरातील विविध झोपडपट्टी भागांत पोलिसांनी गुन्हेगारांचा कसून शोध घेतला. यात १३५ पैकी ८२ गुन्हेगारांवर पोलिसांनी कारवाई केली. तडीपार करण्यात आलेल्या ५९ पैकी एक सराईत तडीपार गुंड शहरात वावरत असताना आढळून आल्याने त्यास अटक करण्यात आली. या मोहिमेत नांगरे-पाटील यांच्यासह उपआयुक्त अमोल तांबे, लक्ष्मीकांत पाटील, पौर्णिमा चौघुले-श्रींगी, विजय खरात, सहायक आयुक्त समीर शेख,
प्रदीप जाधव, आर. आर. पाटील, अशोक नखाते, अनिरुद्ध आढाव, ईश्वर वसावे, मंगलसिंह सूर्यवंशी यांच्यासह २५ पोलीस निरीक्षक, ४९ सहायक निरीक्षक आणि ४५१ कर्मचाऱ्यांचा फौजफाटा रस्त्यावर उतरला होता.
१०४ वाहनचालकांकडून २५ हजारांचा दंड वसूल
शहरातील ३२ लॉजेस, हॉटेल्समध्ये तपासणी करण्यात आली. तर मद्यपान करून वाहन चालविणाºया २८ जणांवर ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या केसेस करण्यात आल्या. आयुक्तालय हद्दीत ठिकठिकाणी नाकाबंदी करीत ३५० वाहनांची तपासणी केली असता, १०४ वाहनांवर दंडात्मक कारवाई करीत २४ हजार ८०० रु पये वसूल करण्यात आले. तसेच १०४ टवाळखोरांनाही पोलिसांनी दणका दिला.

Web Title: A man with a knot in the neck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.