रस्ता नांगरणीवरून एकास जबर मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:12 AM2021-07-17T04:12:29+5:302021-07-17T04:12:29+5:30
चांदवड : तालुक्यातील कोकणखेडे शिवारात रस्ता नांगरणीवरून एकास जबर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतीगट ...
चांदवड : तालुक्यातील कोकणखेडे शिवारात रस्ता नांगरणीवरून एकास जबर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतीगट नंबर ४०१ मध्ये गीतांजली सुनील सोनवणे यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, कारभारी काशीनाथ अहिरे, गोरख कारभारी अहिरे, मोठाभाऊ कारभारी अहिरे सर्व रा. कोकणखेडे यांनी रस्ता नांगरणी करून दिली नाही. या कारणावरून कुरापत काढून गीतांजलीचे सासरे पांडुरंग आनंदा सोनवणे यांना शिवीगाळ करून गोरख अहिरे याने हातातील लोखंडी गजाने पांडुरंग आनंदा सोनवणे यांच्या डोक्यावर मारुन जबर जखमी केले. तर मोठा भाऊ याने हातातील दगडाने व कारभारी अहिरे याने काठीने मारहाण केली व तुम्ही रस्ता नांगरण्यास मनाई केली तर जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत चांदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास हवालदार डी.बी. मोरे करीत आहेत.