समता दौड मॅरेथॉन स्पर्धेत मनमाडकर धावले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 01:00 AM2018-04-12T01:00:40+5:302018-04-12T01:00:40+5:30
मनमाड : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भीमोत्सव २०१८ उत्सवाचा शुभारंभ समता दौड मॅरेथॉन स्पर्धेने करण्यात आला. सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक संजय अपरांती यांनी हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेचे उद्घाटन केले.
मनमाड : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भीमोत्सव २०१८ उत्सवाचा शुभारंभ समता दौड मॅरेथॉन स्पर्धेने करण्यात आला. सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक संजय अपरांती यांनी हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेचे उद्घाटन केले. भीमोत्सव २०१८ या नावाने ११ एप्रिल ते २० एप्रिलपर्यंत भरगच्च कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. आज या उत्सवाची सुरुवात भव्य खुल्या मॅरेथॉन स्पर्धेने करण्यात आली. मालेगाव नाका चौफुली येथून मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली.
५ किमी अंतर असलेल्या या स्पर्धेत सात वर्षाच्या लहान मुलांपासून ते ७८ वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत स्पर्धक सहभागी झाले होते. या मॅरेथॉनचा एकात्मता चौकात समारोप करण्यात आला.श्याम वाघ, शिवानी दाभाडे प्रथममुलांमध्ये श्याम मधुकर वाघ (प्रथम), देवीदास दिनकर पवार (द्वितीय), श्रीकांत विक्रम शिंदे (तृतीय). मुलींमध्ये शिवानी मयाराम दाभाडे (प्रथम), सपना निवृत्ती आहेर (द्वितीय), वैष्णवी कचरू शिंदे (तृतीय) यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. मॅरेथॉन स्पर्धेचे संयोजन क्रीडाशिक्षकांनी केले होते.