महापालिकेच्या मानाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 12:24 AM2017-08-26T00:24:37+5:302017-08-26T00:24:43+5:30
महापालिकेच्या मानाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा मेनरोड येथील पूर्व विभागीय कार्यालयात शहर अभियंता उत्तम पवार व सौ. नीता पवार यांच्या हस्ते विधीवत पूजेनंतर करण्यात आली. तसेच मनपा मुख्यालयात राजीव गांधी भवन येथेही पवार दाम्पत्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
नाशिक : महापालिकेच्या मानाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा मेनरोड येथील पूर्व विभागीय कार्यालयात शहर अभियंता उत्तम पवार व सौ. नीता पवार यांच्या हस्ते विधीवत पूजेनंतर करण्यात आली. तसेच मनपा मुख्यालयात राजीव गांधी भवन येथेही पवार दाम्पत्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. विसर्जन मिरवणुकीत सर्वात पहिल्या क्रमांकावर महापालिकेच्या गणपतीला स्थान असते. मानाच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतरच अन्य सार्वजनिक मंडळांकडून विसर्जन केले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेच्या मेनरोडवरील पूर्व विभागीय कार्यालयात गणेशाची प्राणप्रतिष्ठा केली जाते. यंदाही विधीवत पूजा करत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी शहराची कामे निर्विघ्न पार पाडावी याकरिता गणरायाकडे प्रार्थना करण्यात आली. याप्रसंगी उपआयुक्त हरिभाऊ फडोळ,आर. एम. बहिरम, अग्निशमन दलप्रमुख अनिल महाजन, आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बुकाने, कार्यकारी अभियंता गौतम पगारे, उदय धर्माधिकारी, एस. वाय. पवार, देवेंद्र वनमाळी, नितीन वंजारी, उपअभियंता जितेंद्र पाटोळे, राजकुमार खैरनार, विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, नितीन नेर आदी उपस्थित होते.
‘रामायण’वरही प्राणप्रतिष्ठा
महापौरांचे निवासस्थान असलेल्या ‘रामायण’वरही गणरायाची विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. अतुल पोपट भानसी व सौ. भानसी यांनी गणेशाची विधिवत पूजा केली. यावेळी महापौर रंजना भानसी यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते.