अतिक्रमणातील जप्त शेतमालावर मनपाचा ‘दानधर्म’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 12:53 AM2018-04-17T00:53:38+5:302018-04-17T00:54:10+5:30

सिडकोतील शाहूनगर आणि त्रिमूर्ती चौक येथे महापालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. यावेळी पक्क्या बांधकामांसह फेरीवाल्याने हटविण्यात आले. दरम्यान, फेरीवाल्यांकडून जप्त करण्यात आलेले कलिंगड, खरबूज आणि आंब्यासह शेतमाल हा पाथर्डी फाटा येथील मानवसेवा केंद्रात मोफत वितरीत करण्यात आले.

Manash's 'charity' on encroached land of encroachment | अतिक्रमणातील जप्त शेतमालावर मनपाचा ‘दानधर्म’

अतिक्रमणातील जप्त शेतमालावर मनपाचा ‘दानधर्म’

googlenewsNext

नाशिक : सिडकोतील शाहूनगर आणि त्रिमूर्ती चौक येथे महापालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. यावेळी पक्क्या बांधकामांसह फेरीवाल्याने हटविण्यात आले. दरम्यान, फेरीवाल्यांकडून जप्त करण्यात आलेले कलिंगड, खरबूज आणिआंब्यासह शेतमाल हा पाथर्डी फाटा येथील मानवसेवा केंद्रात मोफत वितरीत करण्यात आले. अतिक्रमणातील माल घेऊन तो दानधर्मात वापरणे म्हणजे एकाच्या तोंडाचा घास काढून दुसऱ्याला देण्याचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया फेरीवाल्यांमध्ये उमटत आहे.शहरातीलअतिक्रमणांच्या विरोधात महापालिकेच्या वतीने विविध ठिकाणी मोहीम सुरू आहे. त्यातच ना फेरीवाला क्षेत्रात बेकायदा व्यवसाय करणाºयांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. त्याच अंतर्गत त्रिमूर्ती चौक परिसरामध्ये रस्त्याच्या दुतर्फा ना-फेरीवाला क्षेत्रामध्ये व्यवसाय करणाºया विक्रेत्यांवर कारवाई करून सुमारे ६७ कलिंगड, ४३ खरबूज तसेच दोन क्रेट वांगी, दोन क्रेट आंबे, एक क्रेट संत्री, असा माल जप्त करून साहित्य जप्त करु न मानवसेवा सेंटर, पाथर्डी फाटा येथे विनामूल्य देण्यात आला. यावेळी काही विक्रेत्यांनी महापालिकेला विरोधही केला. त्यामुळे सदर कारवाईस विरोध करणाºयांविरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्याची कारवाई सुरू आहे.तत्पूर्वी शाहूनगर निर्मला इक्लेव्ह सोसायटी येथील सर्व्हे नंबर ३८/१ मधील प्लॉट नंबर २,३,४ येथील भाऊसाहेब राजोळे यांनी बेडरु मचा दुकान म्हणून वापर व नूतन नायर यांनीदेखील बेडरु मचा दुकान म्हणून वापरात बदल केल्याने दोन गाळे सिल करण्याची कारवाई मनपामार्फत करण्यात आली.सदरची मोहीम अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
कडक कारवाई करणार
सहाही विभागांमध्ये अशाप्रकारे ना-फेरीवाला क्षेत्र, सार्वजनिक रस्ते, फुटपाथ, चौक इ. ठिकाणी अतिक्र मणे करून व्यवसाय करणारे भाजीविक्रे ते, फळविक्रे ते, हॉकर्स, टपरीधारक व इतर तत्सम व्यावसायिक यांच्याविरु द्ध अशाच प्रकारची कडक कारवाई करून प्रसंगी पोलीस विभागात गुन्हेदेखील दाखल करण्यात येतील, असा इशारा महापालिकेने दिला आहे.

Web Title: Manash's 'charity' on encroached land of encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.