'...तर मग मंडल आयोगाला चॅलेंज करावा लागेल'; मनोज जरांगे पाटील यांचा नाशिकमध्ये इशारा
By संजय पाठक | Published: February 8, 2024 01:00 PM2024-02-08T13:00:05+5:302024-02-08T13:00:15+5:30
मनोज जरांगे पाटील आज नाशिक दौऱ्यावर असून त्यांचे नाशिक शहरात मुंबई नाका येथे सकल मराठा समाजाच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले.
नाशिक - तुमची लेकरं बाळ आहेत, तशी आमची पण आहे तुम्ही जगाने आम्हाला जगू द्या मात्र आमच्या आरक्षणाला आडवे याला तर मंडल आयोगाला चॅलेंज करावं लागेल, असा इशारा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज नाशिकमध्ये दिला. मनोज जरांगे पाटील आज नाशिक दौऱ्यावर असून त्यांचे नाशिक शहरात मुंबई नाका येथे सकल मराठा समाजाच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आड ओबीसींचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ तीन वेळा आलेले आहेत. आता त्यांनी ते सोडून द्यावे, ओबीसी समाजाने छगन भुजबळ यांना समजावावे अन्यथा आपल्याला मंडल आयोगाला चॅलेंज करावा लागेल असे जरांगे पाटील म्हणाले. येत्या 10 फेब्रुवारीपासून मुंबईत उपोषण करणार आहोत याचा पुनर्विचार करताना त्यांनी सगे-सोयरे आदेशाची अंमलबजावणी सुरू करावी यासाठी हे उपोषण असल्याचे त्यांनी सांगितलं याशिवाय मराठा समाजावरील आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावे अशी आपली मागणी होती त्याचीही पूर्तता झालेली नाही त्यामुळेही हे उपोषण नमूद असल्याचं जरांगे पाटील म्हणाले.