अखेर नाशिकमध्ये गणेश मंडळांना मंडप शुल्क माफ

By संजय पाठक | Published: September 11, 2023 04:46 PM2023-09-11T16:46:52+5:302023-09-11T16:47:45+5:30

दरवर्षी गणेशोत्सवात मंडप शुल्क माफ करण्याची मागणी हेात असते. मुंबई पुण्यात मंडप शुल्क तातडीने माफ होत असते. मात्र, नाशिकमध्ये दरवर्षी मागणी करावी लागते.

Mandap fee waived off for Ganesha Mandals in Nashik | अखेर नाशिकमध्ये गणेश मंडळांना मंडप शुल्क माफ

अखेर नाशिकमध्ये गणेश मंडळांना मंडप शुल्क माफ

googlenewsNext

गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांना शुल्क माफी देण्याचा प्रस्ताव अखेर नाशिक महापालिकेच्या महासभेत मंजुर झाला असून तसे आदेश आयुक्त तथा
प्रशासक डॉ. अशोक करंजकर जारी केले आहेत. अर्थात वाणिज्य स्वरूपाच्या जाहिराती घेतील त्यांना जाहिरात शुल्क भरणे अनिवार्य करण्यात आले
आहे. महापालिकेची प्रशासकीय राजवटीतील महासभा आणि स्थायी समितीची सभा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि.११) पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक महापालिकेच्या वतीने मंडप धेारणानुसार शुल्क आकारले जाते. ते जास्तीत जास्त साडे सातशे इतके होते. मात्र, ते माफ करण्यात आल्याने मंडळांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

दरवर्षी गणेशोत्सवात मंडप शुल्क माफ करण्याची मागणी हेात असते. मुंबई पुण्यात मंडप शुल्क तातडीने माफ होत असते. मात्र, नाशिकमध्ये दरवर्षी मागणी करावी लागते. यंदा देखील उत्सवाच्या पाश्व'भूमीवर अशीच मागणी करण्यात आली होती. पोलीस आयुक्तालाययात झालेल्या गणेशोत्सव महामंडळाच्य बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली तेव्हा आमदार देवयानी फरांदे यांनी देखील शुल्क माफ करण्याची सूचना महापालिकेच्या उपस्थित अधिकाऱ्यांना केली होती. मात्र, हा प्रस्ताव महापालिकेच्या महासभेत मांडण्यात आला होता. तो मंजुर करण्यात आला आहे.

Web Title: Mandap fee waived off for Ganesha Mandals in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक