गुणपत्रक अपलोड करणे अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 11:47 PM2020-07-30T23:47:36+5:302020-07-31T01:29:33+5:30

नाशिक : दहावीचा निकाल जाहीर होताच शालेय शिक्षण विभागाने अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेसंदर्भात आॅनलाइन सादर करण्याच्या कागदपत्रांविषयी महत्त्वाची सूचना केली असून, त्यानुसार अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अर्ज भरताना आॅनलाइन गुणपत्रक अपलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे, तर माध्यमिक शाळा सोडल्याच्या दाखल्यासह अन्य विविध प्रकारचे कागदपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्याच्या सूचनाही शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे.

Mandatory upload of marks | गुणपत्रक अपलोड करणे अनिवार्य

गुणपत्रक अपलोड करणे अनिवार्य

googlenewsNext
ठळक मुद्देअकरावी प्रवेश : अन्य कागदपत्रांसाठी मुदतवाढ देण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : दहावीचा निकाल जाहीर होताच शालेय शिक्षण विभागाने अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेसंदर्भात आॅनलाइन सादर करण्याच्या कागदपत्रांविषयी महत्त्वाची सूचना केली असून, त्यानुसार अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अर्ज भरताना आॅनलाइन गुणपत्रक अपलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे, तर माध्यमिक शाळा सोडल्याच्या दाखल्यासह अन्य विविध प्रकारचे कागदपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्याच्या सूचनाही शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे.
कोरोनाच्या उद््भवलेल्या परिस्थितीमुळे या वर्षीच्या अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांनी सादर करायच्या विविध प्रमाणपत्रांबाबत उपसचिव राजेंद्र पवार यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या शिक्षण संचालकांना पत्र पाठवून नव्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरताना केवळ दहावीचेच आॅनलाइन गुणपत्रक अपलोड करणे बंधनकारक करण्यात यावे, ज्या विद्यार्थ्यांकडे माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचा दाखला, उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (एनसीएल) ही प्रमाणपत्र उपलब्ध असतील.
असे विद्यार्थी ही प्रमाणपत्रे अपलोड करू शकतील, मात्र ही प्रमाणपत्रे अपलोड करणे बंधनकारक करण्यात येऊ नये, त्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. क्रीडा प्रावीण्य, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ प्रमाणपत्र व बदली आदेश आदी समांतर आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी प्रमाणपत्रे किंवा ही प्रमाणपत्रे मिळण्यासाठी सादर केलेल्या अजार्ची प्रत विद्यार्थ्यांना अर्ज भरतेवेळी अपलोड करणे आवश्यक राहणार आहे. प्रवेशप्रक्रियेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांनी काही तांत्रिक बाबीमुळे सादर न केल्यास त्यांच्याकडून हमीपत्र भरून घेण्यात यावे.विद्यार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात यावी तसेच अकरावीसाठी विद्यार्थ्यांना
देण्यात येणारा प्रवेश हा विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या माहितीच्या व हमीपत्राच्या आधारे देण्यात येणार आहे.
अचूक व योग्य कागदपत्रे सादर करण्याची संपूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यांची असल्याचे संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून देण्यासंबंधीच्या सूचना उपसचिव कार्यालयाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांना केली आहे.

Web Title: Mandatory upload of marks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.