निफाड तालुक्यात मास्क वापरणे अनिवार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 03:14 PM2020-04-23T15:14:08+5:302020-04-23T15:14:16+5:30
ओझर : साथ रोग प्रतिबंधक अधिनियमाच्या आधारे निफाडच्या प्रांताधिकारी अर्चना पठारे यांनी उपविभागातील निफाड व सिन्नर तालुक्यात प्रत्येक नागरिकाला मास्क वापरणे सक्तीचे केले आहे.
ओझर : साथ रोग प्रतिबंधक अधिनियमाच्या आधारे निफाडच्या प्रांताधिकारी अर्चना पठारे यांनी उपविभागातील निफाड व सिन्नर तालुक्यात प्रत्येक नागरिकाला मास्क वापरणे सक्तीचे केले आहे.
ज्याअर्थी जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषित केला आहे.त्याचा प्रसार देश, राज्यासह नाशिक जिल्ह्यात शंभरी पार करून गेला आहे. त्यासाठी प्रशासन गतिमान झाले असून निफाड तालुक्यात अनेक ठिकाणी नागरिक क्वारंटाईन केले जात आहे. ओझर, पिंपळगाव, लासलगाव, सायखेडा, निफाड सारख्या मोठ्या लोकवस्तीच्या गावांमध्ये सुरवातीच्या काळात गर्दी दिसून आली होती.त्यात प्रांत,तहसीलदार व तेथील संबंधित सर्कल यांनी तातडीची उपाययोजना आखत परिस्थिती नियंत्रणात आणून सोशल डिस्टनिसंग सारखा निर्णय राबविला.त्यात आता उपविभागीय अधिकाऱ्यांनी मास्कची सक्ती केल्याने नागरिकांनी ती पाळावी यासाठी स्थानिक प्रशासनाने कंबर कसली आहे.त्यामुळे विना मास्कचा कुणीही आढळला तर स्थानिक पातळीवर पाचशे रु पये दंड वसूल करून तो मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे.