सिन्नरच्या शिशूविहारमध्ये भरवली मंडई !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 05:46 PM2019-12-10T17:46:20+5:302019-12-10T17:46:42+5:30
सिन्नर : स्वयंपाक घरासाठी आई भाजी मंडई येथून विविध प्रकारच्या भाजीपाला घेऊन येत असते. पण तोच भाजीपाला प्रत्यक्ष शालेय आवारात टेबलवर मांडत प्रत्यक्ष कृतीद्वारे भाजी मंडईतील विविध भाज्यांची ओळख चिमुकल्यांना शाळेतच करून दिली.
मुख्याध्यापिका संगीता आव्हाड यांनी रोजच्या अभ्यासक्र मातून चिमुकल्यांना भाजी मंडई येथील भाज्यांची ओळख व्हावी. या हेतूने आदर्श शिशु विहार या संकुलात मेथी, बटाटा, वांगे, फ्लावर, कारले , कोबी, गवार, कांदे ,शेपू आदी भाज्या टेबलवर मांडण्यात आल्या व विविध प्रकारच्या भाज्या चिमुकल्यांनी हातात घेऊन त्यांची नावे व त्यापासून होणारे आरोग्याला फायदे याची माहिती जाणून घेतली. भाज्यांची माहिती शिक्षिका प्रतिभा जाधव, संगिता शिंदे , अर्चना काशीद ,अर्चना खालकर, कविता पवार ,मनीषा तांबे, या शिक्षकांनी करून दिली. कोणत्या भाज्यांपासून कोणते जीवनसत्व मिळतात याची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली या कार्यक्र मासाठी कर्मचारी वंदना मते , सुनिता मोरे, संगीता लोंढे, अलका धरम, शारदा भगत, राणी वाघ, राणी भगत या कर्मचाऱ्यांनी मदत कार्य केले.