सटाण्यात मांडुळाची तस्करी; तिघा विद्यार्थ्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 02:16 AM2018-10-19T02:16:50+5:302018-10-19T02:17:04+5:30
मांडूळ सापाची तस्करी करताना सटाणा पोलिसांनी मांडुळासह अभियांत्रिकी महाविद्यालयीन तीन विद्यार्थ्यांना अटक केल्याने खळबळ उडाली आहे. तिघांकडून दोन तोंडाचा एक मांडूळ जप्त करण्यात आला आहे.
सटाणा : मांडूळ सापाची तस्करी करताना सटाणा पोलिसांनी मांडुळासह अभियांत्रिकी महाविद्यालयीन तीन विद्यार्थ्यांना अटक केल्याने खळबळ उडाली आहे. तिघांकडून दोन तोंडाचा एक मांडूळ जप्त करण्यात आला आहे. जागतिक बाजारपेठेत लाखो रुपये किंमत मिळत असल्याने मांडुळाची तस्करी केल्याचे त्यांनी सांगितले आहे.
सटाणा पोलिसांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेत मांडुळासह तिघांना वनविभागाकडे सुपूर्द केले आहे. सटाण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश साठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांवर वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला. शुक्रवारी (दि. १९) तिघांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
शहरातील राधाई लॉजवर मांडूळ सापाची अवैध विक्री करण्याच्या तयारीत काही तस्कर असल्याची गोपनीय
माहिती सटाणा पोलिसांना मिळाली
होती. सटाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, उपनिरीक्षक गणेश बुवा, हवालदार कैलास खैरनार, विजय वाघ, योगेश
गुंजाळ, जिभाऊ बागुल यांनी लॉजवर छापा टाकला. (पान ५ वर)
छाप्यात यश संजय निकम (रा.आराई ता.सटाणा) व मयूर नागेश सोनवणे (रा.साक्र ी) यांची विचारपूस करून त्यांच्याजवळ असलेल्या पिशवीची झडती घेतली असता त्यांच्याजवळ मांडूळ जातीचा सर्प आढळून आला.पोलिसांनी दोघांकडे सखोल चौकशी केली असता यश निकम याचा मामा स्वप्नील दादासाहेब पगार (रा.आघार खुर्द ता.मालेगाव) यांच्याकडून मांडूळ मिळाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी स्वप्नील पगार यालाही ताब्यात घेत वनविभागाच्या हवाली केले आहे.