पोलिसांच्या तत्परतेमुळे मांडुळाचे वाचले प्राण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2022 01:40 AM2022-03-02T01:40:11+5:302022-03-02T01:40:37+5:30
वडाळागावातील शंभरफुटी रस्त्यावरून नेहमीप्रमाणे इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पथक गस्त घालत होते. यावेळी घरकुल प्रकल्पाजवळ नागरिकांची मोठी गर्दी जमल्याने पोलिसांनी त्यांचे वाहन थांबविले. यावेळी रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नातील भल्या मोठ्या मांडूळ जातीच्या सर्पाला गर्दीतील काही लोक लाठ्या-काठ्याने डिवचण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी सर्पाला रेस्क्यू करत गर्दी हटविली.
इंदिरानगर : वडाळागावातील शंभरफुटी रस्त्यावरून नेहमीप्रमाणे इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पथक गस्त घालत होते. यावेळी घरकुल प्रकल्पाजवळ नागरिकांची मोठी गर्दी जमल्याने पोलिसांनी त्यांचे वाहन थांबविले. यावेळी रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नातील भल्या मोठ्या मांडूळ जातीच्या सर्पाला गर्दीतील काही लोक लाठ्या-काठ्याने डिवचण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी सर्पाला रेस्क्यू करत गर्दी हटविली.
वडाळागावात इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांबळे, सागर पाटील, अमोल सोनवणे यांचे पथक सोमवारी (दि. २८) संध्याकाळी गस्तीवर होते. यावेळी घरकुल प्रकल्पाच्या इमारतींसमोर पोलिसांच्या पथकाला गर्दी जमलेली दिसली. पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी गर्दीला पांगविले असता गराड्यात मांडूळ जातीचा सर्प रस्त्यावर आढळून आला. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी सर्पाला उचलून वाहनात ठेवले आणि बघ्यांची गर्दी बाजूला केली. तसेच जे लोक लाठ्या-काठ्या किंवा दगड भिरकावून मांडुळाला डिवचत होते त्यांना रोखत तेथून हुसकावून दिले. मांडुळाला इंदिरानगर पोलीस ठाण्यात आणून तत्काळ वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांना माहिती दिली. यानंतर वनरक्षक सचिन आहेर यांनी पोलीस ठाण्यात जाऊन मांडुळाला ताब्यात घेतले.