ज्येष्ठ नागरी संघातर्फे मनेगावला स्वच्छता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 06:45 PM2019-06-25T18:45:33+5:302019-06-25T18:46:16+5:30

सिन्नर- पावसाळ्यापूर्वी गाव स्वच्छ झाले पाहिजे या उद्देशाने तालुक्यातील मनेगाव येथे ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ‘एक पाऊल पुढे’ स्वच्छता अभियान राबवण्यात आले.

Manegaon cleanliness campaign by senior civil society | ज्येष्ठ नागरी संघातर्फे मनेगावला स्वच्छता अभियान

ज्येष्ठ नागरी संघातर्फे मनेगावला स्वच्छता अभियान

Next

सिन्नर- पावसाळ्यापूर्वी गाव स्वच्छ झाले पाहिजे या उद्देशाने तालुक्यातील मनेगाव येथे ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ‘एक पाऊल पुढे’ स्वच्छता अभियान राबवण्यात आले.
गावातील अडगळीच्या ठिकाणी साठलेले प्लॅस्टिक, कागद, टायर असा कचरा जमा करून गावाचा परिसर स्वच्छ करण्यात आला. कचऱ्यामुळे पावसाळ्यात गटारी तुंबून गावात रोगराई पसरू नये या उद्देशाने हे अभियान राबवण्यात आले. स्वच्छतेच्या या उपक्रमात संपूर्ण गावाते सहभाग घ्यावा यासाठी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे पत्रक प्रसिद्ध करून घरोघरी वाटून जनजागृती करण्यात आली. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष एम. आर. शिंदे यांनी गावातल बहुसंख्य लोक या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
अ‍ॅड. सी. डी. भोजने, मधुकर पवार, तुकाराम सोनवणे, मच्छिंद्र सोनवणे, पी. पी. सोनवणे, नामदेव सोनवणे, निवृत्ती सोनवणे, भाऊसाहेब सोनवणे, पांडुरंग सोनवणे, परशराम सोनवणे, सोपान शिंदे, राजाराम शिंदे, भाऊसाहेब पडवळ, भरत धरम, रामदास पवार, भानूदास सोनवणे, त्र्यंबक मुरकुटे, विठ्ठल आंबेकर आदींसह नूतन जवाहर विद्यालयातील विद्यार्थी व ग्रामस्थ या उपक्रमात सहभागी झाले होते.
 

Web Title: Manegaon cleanliness campaign by senior civil society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.